कोजिमाशि पतसंस्थेसाठी आज मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोजिमाशि पतसंस्थेसाठी आज मतदान
कोजिमाशि पतसंस्थेसाठी आज मतदान

कोजिमाशि पतसंस्थेसाठी आज मतदान

sakal_logo
By

‘कोजिमाशि’साठी
आज होणार मतदान
२२ केंद्रे; ८५२६ मतदार, रविवारी निकाल
कोल्हापूर, ता. ८ ः कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या (कोजिमाशि) निवडणुकीसाठी उद्या(ता. ९) मतदान होत आहे. शहरातील पद्माराजे गर्ल्स हायस्कूल व न्यू हायस्कूल पेटाळा येथे २२ केंद्रांवर सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होत आहे. मतदान प्रक्रियेसाठी १७५ कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निबंधक प्रदीप मालगावे यांनी दिली.
शिक्षक नेते दादा लाड यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी स्वाभिमानी सहकार आघाडी विरोधात शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखालील राजश्री शाहू लोकशाही विकास आघाडी यांच्यात थेट दुरंगी सामना होत आहे. सत्ताधारी आघाडी या निवडणुकीत विजयाचा चौकार मारणार की लोकशाही आघाडी परिवर्तन करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.
२१ जागांसाठी ५ अपक्षांसह ४७ उमेदवार रिंगणात आहेत. मतमोजणी रविवारी रमणमळा येथील शासकीय धान्य गोदामात होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Phl22b01331 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top