शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी अर्जुन पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी अर्जुन पाटील
शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी अर्जुन पाटील

शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी अर्जुन पाटील

sakal_logo
By

१२९७, १२९८

शिक्षक बँक अध्यक्षपदी
अर्जुन पाटील बिनविरोध
उपाध्यक्षपदी पद्मजा मेढे
फुलेवाडी, ता. १५ ः दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अर्जुन पाटील (हातकणंगले) यांची तर उपाध्यक्षापदी पद्मजा मेढे (करवीर) यांची बिनविरोध निवड झाली. शिक्षक बँकेच्या सभागृहात जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निवड सभा झाली. अध्यक्ष पाटील यांचे नाव सुनील एडके यांनी नाव सुचवले. बाळासाहेब निंबाळकर यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षा मेढे यांचे नाव राजेंद्र पाटील यांनी सुचवले तर वर्षा केनवडे यांनी अनुमोदन दिले.
संचालक एस. व्ही. पाटील, शिवाजी रोडे पाटील, नंदकुमार वाईंगडे, शिवाजी बोलके, बाळकृष्ण हळदकर, अमर वरुटे, बाबूराव परीट, सुरेश कोळी, गौतम वर्धन, रामदास झेंडे, गजानन कांबळे सुकाणू समिती सदस्य ज्योतीराम पाटील, रवीकुमार पाटील, सुनील पाटील, विलास चौगुले, प्रमोद तौंदकर, रघुनाथ खोत, बाजीराव पाटील, बाळासाहेब पोवार, आनंदराव जाधव तसेच शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, ए. के. पाटील, प्रकाश खोत, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम उपस्थित होते.
अध्यक्ष अर्जुन पाटील म्हणाले, ‘‘शिक्षक बँकेचा व्यवसाय व ठेवीमध्ये वाढ होण्यासाठी प्रयत्न करणार. बँकेचा कारभार पारदर्शी व सभासद हिताचा राहील. सभासदांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्य देऊ.’’

Web Title: Todays Latest Marathi News Phl22b01343 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top