
टुडे ४
सकाळ इफेक्ट
0132
कोल्हापूर: रंकाळा चौपाटी शेजारी कोल्हापूर गगनबावडा मुख्यमार्गावर जागोजागी घाणीचे ढीग गेले तीन आठवडे पडून होते.ते हटवून आज पालिका कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली. (छायाचित्र: राजेंद्र पाटील, फुलेवाडी)
रंकाळा मुख्य मार्गाची स्वच्छता
तुंबलेल्या गटारीही स्वच्छ ; नवीन गटर्सचा प्रस्ताव देणार
फुलेवाडी, ता.२ - ऐतिहासिक रंकाळा चौपाटी परिसरातील कोल्हापूर- गगनबावडा या मुख्य मार्गाची पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज स्वच्छता केली. तीन आठवड्यांपासून गटारीतून काढलेल्या घाणीचे ढीग मार्गावर पडून होते. तुंबलेल्या गटारीही स्वच्छ केलेल्या नव्हत्या. शिवाय गटारी शेजारी काढलेली घाण तशीच ठेवली होती. गटर्स मध्ये पाणी तुंबल्याने व घाणीने दुर्गंधी पसरली होती. याचा लोकांना व रंकाळा पर्यटकांनाही त्रास होत होता. याबाबत ‘सकाळ''ने बातमी प्रसिद्ध करून पाठपुरावा केला होता.
तीन आठवडे पूर्वी जागोजागी या गटारीतील घाण काढून मुख्य रस्त्यावरच ठेवली होती. त्यानंतर गटारी स्वच्छ करणे व घाण भरून टाकणे याकडे दुर्लक्ष झाले होते. या घाणीमुळे रंकाळा पाहण्यासाठी येणारे पर्यटकांना गाडीही पार्किंग करता येत नव्हत्या. शिवाय पाणी तुंबल्याने त्याची दुर्गंधीही पसरली आहे. त्याचा पर्यटकांसह रंकाळ्यावर फिरायला येणाऱ्या शहरवासीयांना मोठा त्रास होत होता. आज पालिका कर्मचाऱ्यांनी या संपूर्ण मार्गाची स्वच्छता पूर्ण केली.
रंकाळा चौपाटी परिसरात मुख्य मार्गावर आयआरबीने केलेले गटर्स चॅनेल नळा टाईपचे आहेत. त्यांनी ठराविक अंतरावर चेंबर बांधलेले नाहीत, त्यामुळे त्याची स्वच्छता करता येत नाही. हे गटर्स गाळाने भरून गेले आहेत, त्यामुळे पाणी तुंबून राहते. दुर्गंधी पसरते. हे चॅनेल फोडून तेथील कचरा व गाळ काढावा लागणार आहे. नवीन गटर्स करण्याचा प्रस्ताव पालिकेकडे सादर केला जाणार आहे.
-राजेंद्र पाटील, आरोग्य निरीक्षक, महापालिका
Web Title: Todays Latest Marathi News Phl22b01356 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..