रंकाळ्यात पुन्हा आढळले मृत मासे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंकाळ्यात पुन्हा आढळले मृत मासे
रंकाळ्यात पुन्हा आढळले मृत मासे

रंकाळ्यात पुन्हा आढळले मृत मासे

sakal_logo
By

४३१०६
रंकाळ्यात पुन्हा आढळले मृत मासे
प्रदूषित पाण्याचा फटका; दहा वर्षांपासून केवळ चर्चाच
सकाळ वृत्तसेवा
फुलेवाडी, ता. १३ ः ऐतिहासिक रंकाळा तलावात आज पुन्हा मासे मृत झाल्याचे आढळले. रंकाळ्यातील पाणी प्रदूषणाची झळ वारंवार तलावातील जलचरांना बसत आहे. सध्या रिमझिम पावसाबरोबरच वाराही जोरात वाहत आहे. वाऱ्‍यामुळे रंकाळ्याच्या पाण्यात लाटा निर्माण होतात. वारा व लाटामुळे रंकाळ्याच्या पाण्यातील केरकचरा कडेला जमा होतो. अशाच रीतीने कचऱ्यासह मासेही मृत्युमुखी पडल्याचे आढळले आहे. यापूर्वीही तलावातील मासे व कासवे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
दहा वर्षांत रंकाळा परिसरात सुशोभीकरणाची कामे झाली आहेत. सध्याही विकासकामे सुरू आहेत. मात्र प्रदूषण दूर करण्याच्या मूळ समस्येकडे दुर्लक्षच होत आहे. प्रदूषणाची स्थिती गंभीरच बनत चालली आहे. शाम सोसायटीच्या बाजूकडील नाला पावसाळ्यात थेट रंकाळा तलावात वाहत आहे. नाल्यातील दूषित, सांडपाणी थेट तलावात मिसळत आहे. या सांडपाण्यामुळे पाणी प्रदूषित होत आहे. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले की त्याचा जलचर प्राण्यांना धोका पोहोचतो. त्यामुळे तलावातील मासे वारंवार मृत होण्याच्या घटना घडत आहेत. रंकाळ्याच्या सुशोभीकरणाबरोबरच जे मूळ दुखणं पाणी प्रदूषण आहे ते प्रदूषण दूर करण्याचा पालिकेने प्रयत्न करण्याची गरज रंकाळ्याप्रेमीतून व्यक्त होत असते.

Web Title: Todays Latest Marathi News Phl22b01366 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..