स्वातंत्र्यदिनी रस्त्यावरील खड्यात बसून,जिलेबी वाटून महापालिकेचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वातंत्र्यदिनी रस्त्यावरील खड्यात बसून,जिलेबी वाटून महापालिकेचा निषेध
स्वातंत्र्यदिनी रस्त्यावरील खड्यात बसून,जिलेबी वाटून महापालिकेचा निषेध

स्वातंत्र्यदिनी रस्त्यावरील खड्यात बसून,जिलेबी वाटून महापालिकेचा निषेध

sakal_logo
By

01351
कोल्हापूर : फुलेवाडी रिंग रोडवरील खड्ड्यात बसून, जिलेबी वाटून महापालिकेचा निषेध करण्यात आला.

खड्ड्यात बसून, जिलेबी वाटून
महापालिकेचा केला निषेध

सकाळ वृत्तसेवा
फुलेवाडी, ता. १६ ः फुलेवाडी रिंग रोडवरील कणेरकरनगर ते आपटेनगरदरम्यानच्या खराब रस्त्याचे काम न झाल्याच्या निषेधार्थ स्वातंत्र्यदिनी रस्त्यातील खड्ड्यात बसून, जिलेबी वाटून महापालिकेचा निषेध करण्यात आला.
जुन्या फुलेवाडी रिंग रोडचे काम होण्यासाठी येथील नागरिकांनी यापूर्वी अनेक आंदोलने केली. दिवाळीच्या दिवशी अभ्यंग स्नान, रस्त्याचे श्राद्ध, रास्ता रोको आणि प्रसंगी आत्मदहनाचा इशाराही दिला होता. त्यानंतर प्रशासनाने रस्ता मंजूर झाल्याचे सांगितले; पण पुढे रस्त्याचे काम काही झाले नाही.
त्यामुळे ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने या जुन्या फुलेवाडी रिंग रोड येथील नागरिकांनी या रस्त्यामधील खड्ड्यात बसून, जिलेबी खाऊन आणि रस्त्यावरील ये-जा करणाऱ्या नागरिकांना जिलेबी वाटून महापालिका प्रशासनाचा अभिनव पद्धतीने निषेध केला. यावेळी प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.
या आंदोलनात माजी नगरसेवक अमोल माने, सुहास आजगेकर, शीतल सूर्यवंशी, रवींद्र चिखलकर, अमित पाटील, सतीश खोत, समरजित जगदाळे, अक्षय चाबूक, सारंग रणदिवे, पवन साळोखे, शुभम कांबळे, बबलू चव्हाण सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Phl22b01369 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..