शिक्षक बँक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक बँक
शिक्षक बँक

शिक्षक बँक

sakal_logo
By

कागदोपत्री नफ्यामुळे
लाभांश देता येणार नाही
अध्यक्ष अर्जुन पाटील; वचननामा पूर्ण करण्यास बांधील
सकाळ वृत्तसेवा
फुलेवाडी, ता. १६ ः मागील संचालक मंडळांने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून रिझर्व्ह बँकेचे नियम डावलून योग्य तरतुदी न करता गेल्या आर्थिक वर्षात २ कोटी ३८ लाख रुपये कागदोपत्री नफा दाखविला आहे. लेखापरीक्षकांच्या सूचनेनुसार या वेळी आर्थिक तरतुदी केल्या आहेत. त्यामुळे सभासदांना लाभांश देता येत नाही. पुढील वर्षांपासून दिलेला वचननामा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अर्जुन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिक्षक बँकेची वार्षिक सभा रविवारी होत आहे.
पाटील म्हणाले, ‘‘सभासदांना लाभांश देण्यासारखी बँकेची आर्थिक परिस्थिती नाही. हा ताळेबंद पूर्वीच्या संचालक मंडळाचा असून त्यांनी इतर तरतुदी न करता चुकीचा नफा दाखविला आहे. दोन महिन्यांत ३२ कोटी ठेवी वाढल्या आहेत. १४० नवीन सभासद झालेत. या काळात ४० कोटींची रोखे व फंड यामध्ये गुंतवणूक करून बँकेस फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या चारशे कोटींवर ठेवी असून पुढील आर्थिक वर्षात सातशे कोटींच्या वर व्यवसाय करण्याचा मानस आहे. डीसीपीएस धारकांसाठी एक नवीन योजना लागू करण्यासाठी कमिटी नेमली आहे.’’
बँकेचे उपाध्यक्षा पद्मजा मेढे, संचालक एस. व्ही. पाटील, अमर वरुटे, राजेंद्र पाटील, शिवाजी रोडे पाटील, शिवाजी बोलके, बाळकृष्ण हळदकर, सुनील एडके, बाळासाहेब निंबाळकर, बाबूराव परीट, वर्षा केनवडे, रामदास झेंडे, सुरेश कोळी गौतम वर्धन, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Phl22b01387 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..