पान ५ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ५
पान ५

पान ५

sakal_logo
By

52523
कोजिमाशिची ४० लाख कर्ज मर्यादा
वार्षिक सभेत ठराव; विरोधकांची सभेकडे पाठ, २१ वरून २५ जण संचालक

सकाळ वृत्तसेवा
फुलेवाडी, ता. २५ ः कर्ज मर्यादा ३५ वरून ४० लाख रुपये वाढविण्याचा व २१ वरून २५ जणांचे संचालक मंडळ करण्याचा ठराव एकमताने ‘कोजिमाशि’च्या सभेत करण्यात आला. संस्थेची ५२ वी वार्षिक सभा विरोधकाविना झाली. विरोधकांनी सभेकडे पाठ फिरवली. मार्केट यार्डातील शाहू सांस्कृतिक सभागृहात कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था (कोजिमाशिची) आज वार्षिक सभा झाली. अध्यक्षस्थानी सभापती डॉ. डी. एस. घुगरे होते.
प्रारंभी तज्‍ज्ञ संचालक दादा लाड यांनी स्वागत करून संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. पाच वर्षांत निवडणुकीत दिलेल्या वचननामा पूर्ण करणार, सभासदांच्या मागणीनुसार कॅशलेस मेडिक्लेम योजना, सभासद मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पाच लाख कर्ज प्रचलित व्याजदरापेक्षा अर्धा टक्के कमी व्याजदराने दिले जाईल.
असे सांगितले.
अध्यक्ष घुगरे म्हणाले, ‘‘संस्थेस चार कोटी ५५ लाख नफा झाला. सभासदांना २२ टक्के लाभांश दिला जाईल. ६०० कोटी ठेवीचा टप्पा पार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. संस्थेचे एटीएम व मोबाईल ॲप सुरू करण्याचा मानस आहे.’’ या वेळी सभासदांनी ‘सभापती ओके, ओके'' म्हणून त्यांना दाद दिली.’’
मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद पाटील यांनी अहवालवाचन केले. सर्व ठराव एकमताने मंजूर झाले. सभेत अशोक मानकर, डी. आर. पवार, सागर पाटील,
वंदना कांबळे, विजय कांबळे आनंदा कांबळे, महालिंग मिठारी, मधुकर पाटील आदींनी चर्चेत भाग घेतला. सभेपूर्वी संस्थेच्या मुख्य प्रवर्तक सुशीलादेवी कुलकर्णी व शिक्षणतज्‍ज्ञ डी. बी. पाटील यांच्या तैलचित्राचे अनावरण केले.
ठरावीक लोकांच्या चौकटीतून शिक्षक आमदारांनी बाहेर पडावे. सभासदांचा कौल लक्षात घेऊन विधायक काम कराणाऱ्याकडे यावे, असे मत संजय परीट यांनी मांडले. ज्यांना उमेदवारी दिली नाही, असे माजी सभापती हलगी वाजवून नाचले पण त्याचा निवडणुकीत उपयोग झाला नाही. परीट याच्या या वक्तव्यास श्रीधर गोंधळी यांनी विरोध केला. संचालक बाळ डेळेकर, राजेंद्र रानमाळे, अनिल चव्हाण, दीपक पाटील, मनोहर पाटील, प्रकाश कोकाटे, ऋतुजा पाटील, शीतल हिरेमठ, मदन निकम आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष पांडुरंग हळदकर यांनी आभार मानले.

अवांतर भाषणावरून गोंधळ
सभेत प्रश्न सोडून आण्णासाहेब चौगुले अवांतर बोलू लागल्याने त्यांना सभासदांनी अटकाव केला. विरोध करूनही ते बोलत राहिल्याने सत्ताधारी सभासदांनीच व्यासपीठावर चढून त्यांना विरोध केला. या वेळी गोंधळ उडाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून सर्वांना शांत केले. या वेळी ढकलाढकलीही झाली.

महत्त्वाचे निर्णय
* ३० वरून ४० कोटी रुपये संस्थेचे अधिकृत भाग भांडवल करणे
*३५ वरून ४० हजार रुपये सभासद शेअर्स मर्यादा वाढवणे.
*सभासदांना २२ टक्के लाभांश व दिवाळीला १० लिटर तेल व एक किलो बासमती तांदूळ