‘कास्ट्राईब’च्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘कास्ट्राईब’च्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार
‘कास्ट्राईब’च्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

‘कास्ट्राईब’च्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

sakal_logo
By

01430
कोल्हापूर : ‘कास्ट्राईब’चे सरचिटणीस संजय कुर्डूकर यांचा सत्कार करताना गटशिक्षणाधिकारी समरजित पाटील.

‘कास्ट्राईब’च्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार
फुलेवाडी : करवीर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधी पावत्यांचे काम अपडेट करण्यासाठी
कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे नेहमीच योगदान राहिले. त्याबद्दल संघटना पदाधिकाऱ्यांचा ‘करवीर’चे गटशिक्षणाधिकारी समरजित पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गेल्या पाच वर्षांपासून कास्ट्राईब शिक्षक संघटना सर्व शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या अद्ययावत ठेवण्याचे काम करत आहे. त्याबद्दल कास्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष व शिक्षक बँकेचे संचालक गौतम वर्धन, सरचिटणीस संजय कुर्डूकर, पी. डी. सरदेसाई, बाळासाहेब कांबळे, आकाराम कांबळे, दिनकर जगदीश, डी. के. कांबळे, विजय केंद्रे, हेमलता कुर्डूकर, डी. एल. कांबळे, आनंद सामंत, विजय कांबळे यांचे सहकार्य लाभले. याबद्दल सर्वांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी आनंदराव आकुर्डेकर, एस. के. यादव, विश्‍वास सुतार, अधीक्षक रणजीत शिंदे, आबा शिंदे, तसेच महेश सांगावकर उपस्थित होते.