संवर्ग १ व २ च्या शिक्षकांना बदलीमध्ये विना अट संधी मिळावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संवर्ग १ व २ च्या शिक्षकांना बदलीमध्ये विना अट संधी मिळावी
संवर्ग १ व २ च्या शिक्षकांना बदलीमध्ये विना अट संधी मिळावी

संवर्ग १ व २ च्या शिक्षकांना बदलीमध्ये विना अट संधी मिळावी

sakal_logo
By

संवर्ग एक, दोनच्या शिक्षकांना
बदलीत विनाअट संधी द्या
---
पुरोगामी शिक्षक संघटनेचे निवेदन
सकाळ वृत्तसेवा
फुलेवाडी, ता. २० ः राज्यातील प्राथमिक शिक्षकांची जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे सुरू झाली आहे. यात प्रथमच लाभ घेणाऱ्या संवर्ग एक व संवर्ग दोनमधील शिक्षकांना शाळेतील सेवेची तीन वर्षांची अट न लावता विनाअट विनंती बदलीचे अर्ज करण्यासाठी सुविधा द्यावी, अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे व बदली प्रक्रिया समितीचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांना याबाबतचे निवेदन दिल्याची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी दिली.
शासनाच्या बदली धोरण निर्णयानुसार संवर्ग एक व दोनमधील शिक्षकांनी बदलीत एकदा लाभ घेतलेला असेल तर पुन्हा तीन वर्षे विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही, असे निर्देश आहेत. पण, प्रथम लाभ घेणाऱ्यांसाठी कोणतीही सेवेची अट सदर शासन निर्णयात नाही. असे असताना प्रथम लाभ घेणाऱ्या संवर्ग १ व संवर्ग २ च्या शिक्षकांना शाळेतील सेवेची अट लावणे अन्यायकारक असल्याने त्यांना बदलीत विनाअट संधी मिळणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
संगणकीय प्रणालीद्वारे बदलीबाबत शासनाने नुकतेच वेळापत्रक जाहीर केले. पण, पहिल्याच टप्प्यात संवर्ग एक व दोनबाबत शासन निर्णयातील निर्देशानुसार अंमलबजावणी होत नसल्याने शिक्षकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे.