
करवीर तालुकास्तरीय अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धांना सुरुवात
01481
कोल्हापूर : करवीर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या प्रारंभप्रसंगी मोहन पाटील, गटशिक्षणाधिकारी समरजित पाटील, वसुंधरा कदम, विस्तार अधिकारी आनंदराव आकुर्डेकर, विश्वास सुतार, डी. ए. पाटील, प्राचार्य संजय चव्हाण आदी.
जय-पराजयापेक्षा जिद्दीने खेळणे महत्त्वाचे ः
समरजित पाटील; करवीर तालुकास्तरीय अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धेस प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
फुलेवाडी, ता. २६ ः स्पर्धेत जय-पराजयापेक्षा शेवटपर्यंत जिद्दीने खेळणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी असणारी कौशल्ये स्पर्धेतून पुढे येऊन संधीचे सोने करण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा महत्त्वाच्या आहेत, असे करवीर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी समरजित पाटील यांनी सांगितले.
जिल्हा परिषद व करवीर पंचायत समितीतर्फे शिंगणापूर क्रीडा प्रशालेत तालुकास्तरीय अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य मोहन पाटील होते.
यावेळी लाठीकाठी, मनोरे व लेझीम यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. अधीक्षक वसुंधरा कदम, प्राचार्य संजय चव्हाण,
केंद्रप्रमुख रमेश निगवेकर, शिक्षक बँकेचे संचालक एस. व्ही. पाटील, गौतम वर्धन, प्रसाद पाटील, संजय कुर्डूकर, शाहू बनकर, नरेंद्र वरूडकर आदी उपस्थित होते.
शिक्षण विस्तार अधिकारी डी. ए. पाटील यांनी स्वागत केले. विश्वास सुतार यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन विजय गारे यांनी केले. विस्तार अधिकारी आनंदराव आकुर्डेकर यांनी मानले.