Sun, Jan 29, 2023

रंकाळा प्रदक्षिणा उपक्रम शनिवारी
रंकाळा प्रदक्षिणा उपक्रम शनिवारी
Published on : 29 December 2022, 1:49 am
रंकाळा प्रदक्षिणा
उपक्रम उद्या
फुलेवाडी : रंकाळा संरक्षण व संवर्धन समिती आणि कोल्हापूर वॉकर्स यांच्यातर्फे शनिवारी (ता. ३१) डिसेंबर रोजी पहाटे चार वाजता रंकाळा प्रदक्षिणेचे आयोजन केले आहे. ‘चाला आरोग्यासाठी, स्वच्छ सुंदर रंकाळ्यासाठी’ हा संदेश देण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून नववर्षाच्या पूर्वसंध्येला हा उपक्रम राबविला जातो. पहाटे चार वाजता या उपक्रमास डी मार्टसमोरून सुरुवात करण्यात येणार आहे. साडेसात वाजेपर्यंत रंकाळ्यास प्रदक्षिणा घालण्यात येतील. रंकाळा तलावास पाच प्रदक्षिणा पूर्ण केलेल्या वॉकर्सना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन कोल्हापूर वॉकर्सचे अध्यक्ष धोंडीराम चोपडे, परशुराम नांदवडेकर, नाना गवळी, अजित मोरे आदींनी केले आहे.