
रंकाळ्याभोवती ५० लोकांच्या पाच प्रदक्षिणा
01486, 01487
कोल्हापूर : नववर्षाच्या पूर्वसंध्येला रंकाळ्याभोवती पाच प्रदक्षिणा चालण्यासाठी सहभागी झालेले रंकाळा वॉकर्स. दुसऱ्या छायाचित्रात रंकाळा प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या धावपटूंना प्रशस्तीपत्र देताना जयसिंगराव माने व मधुसूदन सावंत.
रंकाळ्याभोवती ५० लोकांच्या पाच प्रदक्षिणा
२२ किमी साडेतीन तासांत पूर्ण; ‘चाला आरोग्यासाठी, स्वच्छ सुंदर रंकाळ्यासाठी’ उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
फुलेवाडी, ता. ३१ : ‘चाला आरोग्यासाठी, स्वच्छ सुंदर रंकाळ्यासाठी’ हा संदेश देण्यासाठी रंकाळा संवर्धन व संरक्षण समिती व कोल्हापूर वॉकर्स यांच्यातर्फे रंकाळा तलावाभोवती चालत पाच फेऱ्या पूर्ण केल्या. २२ किलोमीटर अंतर साडेतीन तासांत पूर्ण केले. १० महिलांसह सुमारे ५० वर नागरिक या उपक्रमात पहाटेपासूनच सहभागी झाले होते.
आज पहाटे चार वाजता कोल्हापूर अर्बन बँकेचे संचालक बाबूराव मकोटे व धावपटू महिपती संकपाळ यांच्या हस्ते परिक्रमेस सुरुवात झाली. यावर्षी सुमारे ५० वर लोकांनी रंकाळ्याच्या पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्या. धोंडीराम चोपडे, नाना गवळी, राजेश पाटील, प्रा. एस. पी. चौगुले, नंदकुमार दिवटे, अनिल पोतदार, उदय गायकवाड, सत्यजित जगदाळे, समीर हसबनीस, आकाराम शिंदे, विजय देसाई, आरती संकपाळ, राजश्री नांदवडेकर, जयश्री शिंदे आदींनी पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्या.
या वेळी महिपती संकपाळ, कस्तुरी सावेकर, परशुराम नांदवडेकर, डॉ. देवेंद्र रासकर, अविनाश हावळ, आकाराम शिंदे, विद्या चव्हाण यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. अर्बन बँकेचे उपाध्यक्ष जयसिंगराव माने, संचालक मधुसूदन सावंत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे देण्यात आली. या वेळी चंद्रकांत यादव, पंडित पोवार, अजय कोराने उपस्थित होते. उपक्रमास सुनील चिले, प्रकाश पाटील, राजशेखर तंबाके, अविनाश जेऊरकर, विनायक कुलकर्णी आदींनी सहकार्य केले. उपक्रमाचे संयोजन धोंडीराम चोपडे, नाना गवळी, अजित मोरे, परशुराम नांदवडेकर, विकास जाधव आदींनी केले.