परीक्षार्थींसाठी जिल्ह्यात
२० समुपदेशक सज्ज

परीक्षार्थींसाठी जिल्ह्यात २० समुपदेशक सज्ज

परीक्षार्थींसाठी जिल्ह्यात
२० समुपदेशक सज्ज
फुलेवाडी, ता. १६ : कोरोनानंतर यावर्षी प्रचलित पद्धतीनुसार दहावी बारावीच्या परीक्षा केंद्रावरती होत आहेत. शैक्षणिक जीवनात दहावी व बारावीच्या परीक्षांना विशेष महत्त्व आहे. परीक्षेबाबत काही विद्यार्थी दडपण घेतात. परीक्षेच्या भीतीमुळे विद्यार्थी तणावात असेल तर त्याला मार्गदर्शन करण्यासाठी विद्या परिषदेने संपूर्ण राज्यात समुपदेशकांची निवड केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात असे वीस समुपदेशक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज आहेत.
परीक्षापूर्व, परीक्षेदरम्यान, परीक्षेनंतर तसेच निकाल लागल्यानंतरच्या कालावधीत समुपदेशन सेवा मोफत उपलब्ध राहणार आहे. या समुपदेशकांकडून विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताणतणाव कमी करणे, तसेच करिअरविषयक मार्गदर्शनही मिळणार आहे.
जिल्ह्यातील समुपदेशक असे, सुभाष पाटील, सूर्यकांत चांदणे, अनिल कांबळे, भाऊसो सुतार (शाहूवाडी), संभाजी सुतार, नरसिंह राठोड, एकनाथ चौगुले, विनायक कांबळे (करवीर), संभाजी पाटील, श्रीरंग तांबे, बसलिंग मगदूम (गडहिंग्लज), अब्दुल पटवेकर (हातकणंगले), अरविंद किल्लेदार, राजाराम पाटील (कागल), मारुती तळसंदेकर (पेठवडगाव), मारुतराव मलमे, संभाजी घरपणकर (पन्हाळा), विश्‍वास पवार (गगनबावडा), संजय पाटील (शिरोळ), सरला पाटील (कोल्हापूर).
---------------
कोट
विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता निर्भयपणे परीक्षेला सामोरे जावे. काही समस्या असल्यास जिल्ह्यातील समुपदेशकांशी संपर्क साधून मार्गदर्शन घ्यावे. समुपदेशन सेवा मोफत उपलब्ध आहे. 
- डॉ. आय. सी. शेख, प्राचार्य डायट कोल्हापूर
-------------
कोट
परीक्षा काळात पालकांनी मुलांना आत्मविश्‍वास द्यावा. मुलांनी परीक्षेला संपूर्ण जीवन समजू नये. मी पेपर चांगलाच लिहणार, असा सकारात्मक विचार ठेवून, शांत मनाने पेपर लिहावा. स्वत:वरील विश्‍वास महत्त्वाचा आहे.
- सुभाष पाटील, समुपदेशक शाहूवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com