
रंकाळा उद्यानातील बेंच तळीरामांनी लांबवले
01647
कोल्हापूर :रंकाळा पदपथ उद्यानातील झाडाखालील बेंच उखडून, मोडून काढले आहेत.
...
रंकाळा उद्यानातील बेंच तळीरामांनी पळविले
साहित्याची मोडतोड: टाकाऊ साहित्य फेकले रंकाळ्यात
फुलेवाडी, ता.१३ ः ऐतिहासिक रंकाळा तलाव पदपथ उद्यानातील लोखंडी (बीडाच्या) बेंचची तळीरामांनी मोडतोड केली. भंगारमध्ये विकण्यासाठी लोखंडी-बिडाचे साहित्य लंपास केले. तर लाकडी साहित्य रंकाळा कठड्याच्या आत फेकून दिले. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत पाच-सहा तरूण दारू पिऊन दंगामस्ती करत होते. त्यांनीच हा प्रकार केला असल्याचे उद्यानातील वॉचमनने सांगितले. या प्रकाराबद्दल रंकाळाप्रेमींनी तीव्र निषेध व्यक्त केला.
अंबाई टॅंक नजिकच्या उद्यानातील बोधिवृक्षाजवळ व संरक्षण कठड्याच्या कोपऱ्यात झाडाखाली लोखंडी बीड व लाकडाचे मिळून नागरिकांना बसण्यासाठी दोन बेंच ठेवले होते. झाडाच्या सावलीत बेंचवर नेहमीच लोक बसून राहायचे. शुक्रवारी रात्री उशिरा कोपऱ्यात पाच-सहा तरुणांचे टोळके दारू पीत होते. दंगमस्ती चालू होती. उद्यानातील वॉचमनने त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी ऐकले नाही.रात्री उशिरा या तरुणांनी बेंच जमिनीतून उखडून, मोडून काढले. लाकडी साहित्य कठड्याचे आत रंकाळ्यात फेकून दिले. तर लोखंडी बिडाचे साहित्य लंपास केले.
रंकाळा तलाव परिसराचे क्षेत्रफळ मोठे आहे. परिसरात एक वॉचमन काही करू शकत नाही. रंकाळा परिसरात रात्र होताच तळीरामांची
संख्या वाढते. यामध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात असतो. दारू पिण्याबरोबर झाडाखाली बसून, तसेच पाणी कमी झाल्याने तलावाच्या आत मध्ये जाऊन हे तरुण चरस गांजा ओढत असल्याचे चित्र दिसत असते. त्यामुळे या परिसरात वॉचमन बरोबरच पोलिसांची ही वारंवार गस्त होणे आवश्यक आहे.