शिक्षक भरती न झाल्यास बेमुदत आंदोलन  पुरोगामी शिक्षक संघटनेच्या बैठकीत ठराव

शिक्षक भरती न झाल्यास बेमुदत आंदोलन पुरोगामी शिक्षक संघटनेच्या बैठकीत ठराव

शिक्षक भरती न झाल्यास बेमुदत आंदोलन

पुरोगामी शिक्षक संघटनेच्या बैठकीत ठराव


फुलेवाडी, ता.२ः राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी रिक्त असलेली शिक्षक पदे शासनाने ३१ जुलैपूर्वी भरावीत अन्यथा महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने आझाद मैदानावर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा ठराव आज कोल्हापूर येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला. राज्य नेते विजय भोगेकर (चंद्रपूर) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील होते.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत ३० ते ३५ हजार शिक्षक पदे रिक्त असून त्याचा विपरित परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होऊ शकतो. त्यामुळे सर्व रिक्त पदे तत्काळ भरणे आवश्यक असल्याचे सर्वांनी मत व्यक्त केले.
शिक्षणाच्या झपाट्याने बदलणाऱ्या ध्येय धोरणांमुळे शिक्षण क्षेत्रात अनेक आव्हाने निर्माण होत असताना आव्हानांना समर्थपणे झेलण्यासाठी शिक्षकांनी संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे रहायला हवे, असे प्रतिपादन प्रसाद पाटील यांनी केले.
विजय भोगेकर म्हणाले, ‘शिक्षकांनी संघटनात्मक कामात स्वतःला झोकून देऊन काम करणे गरजेचे बनले आहे.’ महिला राज्याध्यक्षा अलका ठाकरे म्हणाल्या, ‘पुरोगामी शिक्षक संघटनेत महिलांना सन्मानाचे स्थान असून मोठ्या विश्वासाने सर्व जिल्ह्यात महिलांचेही विविध उपक्रम सातत्याने होतात.’
सभेत जुनी पेन्शन योजना लागू करणे, डीसीपीएस कपातीचा हिशोब देणे, राज्यभर रखडलेल्या पदोन्नती पार पाडणे, राज्यातील रिक्त पदांवर शिक्षक भरती प्रक्रिया राबविणे, दहा, वीस, तीस आकृतीबंध शिक्षकांना लागू करणे आदी विषयांवर चर्चा होऊन या मागणीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे ठराव करण्यात आले.
बैठकीस राज्य सरचिटणीस हरिश ससनकर (चंद्रपूर), कार्याध्यक्ष प्रकाश पाध्ये (रत्नागिरी), महिला राज्य सरचिटणीस शारदा वाडकर , प्रमिला माने, दिलीप भोई, अनिल मोहिते, पी.आर. पाटील , मालती राजमाने आदी पदाधिकारी उपस्थित होते. अशोक खाडे यांनी स्वागत केले. प्रकाश पाध्ये यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com