हुपरी पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हुपरी पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार
हुपरी पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार

हुपरी पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार

sakal_logo
By

01303

---
हुपरी पोलिस ठाण्यातील
अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार
पट्टणकोडोली, ता. ११ : नुकत्याच झालेल्या महापुरुषांच्या जयंतीवेळी कायदा व सुव्यवस्थेची चांगली अंमलबजावणी करून मोठ्या उत्साहात जयंती पार पाडल्याबद्दल हुपरी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीतर्फे सत्कार करण्यात आला. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र, हुपरी येथे फळांचे वाटप करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान महावीर जयंती झाली तसेच रमजान ईद झाला. यावेळी हुपरीसह पंचक्रोशीत मिरवणुका काढण्यात आल्या; मात्र कोणतीही धार्मिक तेढ, तंटा, वादविवाद निर्माण होऊ देण्यात आला नाही. कार्यक्रमांमध्ये कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी उत्तमपणे झाली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हुपरी पोलिस ठाण्यातील सर्व पोलिस, अधिकारी यांचा फेटे बांधून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
वंचित बहुजन आघाडी हुपरीचे अध्यक्ष पांडुरंग मानकापुरे, चरणदास कांबळे, प्रणित मधाळे, प्रवीण शिंगे, सुहास हुपरीकर, धर्मवीर कांबळे, अक्षय चाणक्य, शीतल कांबळे, प्रथमेश नवले, अक्षय फुले, अमर कांबळे, सुशील मानकापुरे, दीपक शेंडे, वैभव शेंडे, प्रशांत वडगांवकर, अनिकेत कांबळे, योगेश कांबळे, पंकज मानकापुरे, निखिल कुरणे, विश्वजित चव्हाण आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pkd22b00905 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top