विद्युत पुरवठ्यातील अचानक बिघाडामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्युत पुरवठ्यातील अचानक बिघाडामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक
विद्युत पुरवठ्यातील अचानक बिघाडामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक

विद्युत पुरवठ्यातील अचानक बिघाडामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक

sakal_logo
By

पट्टणकोडोली येथे
वीज उपकरणे जळाली
लाखोंचे नुकसान; विजेचा दाब वाढल्याने घटना
पट्टणकोडोली, ता. २१ ः येथील हुपरेनगर भागाला वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्स्फॉर्मरमध्ये झालेल्या बिघाडामुळे अचानकपणे विजेचा दाब वाढून अनेक घरांतील वीज उपकरणे जळाली. बल्ब, पाईप फुटून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
हुपरेनगर भाग सर्वाधिक विस्तारलेला आहे. त्यामुळे या भागातील विद्युत पुरवठ्यासाठीचे ट्रान्स्फॉर्मर मोठे आहेत. रात्री १० च्या सुमारास अचानकपणे अनेक घरांतील टीव्ही जळाले. काही समजण्याच्या आतच बल्ब जळाले. काही ठिकाणी बल्ब व पाईप जळून फटाफट फुटल्या. डेअरी व रक्त-लघवी तपासणी सेंटरमधील संगणकही जळून खाक झाले.
अचानक झालेल्या प्रकारामुळे लोक घराबाहेर पळत सुटले. त्यामुळे या भागात गोंगाट उडाला. वीज वितरण कार्यालयात फोन करताच वायरमननी घटनास्थळावर धाव घेतली. ताबडतोब वीज पुरवठा बंद केल्याने अनर्थ टळला.

कोट
ग्रामस्थांचा फोन आल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून वीज पुरवठा बंद केला आहे; पण असे घडण्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही. त्याचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे.
ए. ए. चौगुले, कनिष्ठ अभियंता, पट्टणकोडोली

Web Title: Todays Latest Marathi News Pkd22b00908 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..