इंगळीत मगरीचे दर्शन,शेतकरी - ग्रामस्थांतुन घबराट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंगळीत मगरीचे दर्शन,शेतकरी - ग्रामस्थांतुन घबराट
इंगळीत मगरीचे दर्शन,शेतकरी - ग्रामस्थांतुन घबराट

इंगळीत मगरीचे दर्शन,शेतकरी - ग्रामस्थांतुन घबराट

sakal_logo
By

इंगळी पाणवठ्यावर
आढळला मगरीचा वावर

पट्टणकोडोली ता. २१ ः इंगळी (ता. हातकणंगले) येथे पंचगंगा पात्रात दत्त मंदिर परिसरातील घाटानजीक सायंकाळच्या सुमारास मगरीचा वावर काही शेतकऱ्यांना दिसला आहे. यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाने लक्ष देण्याची नागरिकांतून मागणी होत आहे.
इंगळी गाव पंचगंगा नदी काठावर वसलेले असून शेती हे एकमेव उत्पन्नाचे साधन आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते. त्यामुळे ग्रामस्थांना शेतीकडे जाणे अनिवार्य आहे. आज सायंकाळी नेहमीप्रमाणे दत्त मंदिराकडील घाट परिसरात शेतकरी काम करीत असताना अनेकांच्या नजरेस मगर पडली. मगर म्हसोबा मळीपर्यंत फिरत असल्याचे लक्षात आले. ग्रामपंचायतीने नदीमध्ये पोहायला जाण्यास, महिलांना घाटावर जाण्यास मज्जाव केला. इंगळीत पहिल्यांदाच मगरीचा वावर दिसल्याने घबराट निर्माण झाली आहे. प्रशासनाने लक्ष घालून बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरीत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pkd22b00909 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..