तुळजाभवानी महायज्ञ व महापूजेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुळजाभवानी महायज्ञ व महापूजेचे आयोजन
तुळजाभवानी महायज्ञ व महापूजेचे आयोजन

तुळजाभवानी महायज्ञ व महापूजेचे आयोजन

sakal_logo
By

२९४१

व्यापारी असोसिएशनला २५ लाखांवर नफा
सरवडे : येथील व्यापारी असोसिएशन को-ऑप. क्रेडिट सोसायटीस २५ लाख २२ हजार ६९९ रुपये नफा झाला असून सभासदांना ८ टक्के लाभांश व दिवाळी भेट देणार असल्याची माहिती अध्यक्ष कुंडलिक पाटील यांनी दिली. सोसायटीच्या सहाव्या वार्षिक सभेत ते बोलत होते. चालू आर्थिक वर्षात संस्थेला राधानगरी तालुका कार्यक्षेत्र विस्तारास पुणे आयुक्तांनी परवानगी दिल्याचे पाटील यांनी सांगतिले. बाळासाहेब कदम यांनी अहवाल वाचन केले. चर्चेत शिवाजी वागवेकर, बाजीराव मोरे, शंकर पोवार, जयवंत जरग, सातापा एरुडकर, सिद्राम कांबळे, रामचंद्र काळूगडे यांनी भाग घेतला. संचालक गणपती आरडे, तुकाराम नवाळे, अजित रानमाळे, सचिन जठार, पांडुरंग खोत, सचिन वागवेकर, शरदचंद्र पोवार, विजय येटाळे, प्रशांत पाटील, मनोज पोवार, संजय गुरव, नंदकिशोर मोरे, वैशाली मगदूम, ज्योती खोराटे, सभासद, कर्मचारी उपस्थित होते. उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी आभार मानले.

ग्रामीण रुग्णालयास समरजितसिंह यांची भेट
मुरगूड : येथील डेंगी साथीच्या पार्श्वभूमीवर शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी ग्रामीण रुग्णालय व नगरपालिका कार्यालयास भेट दिली. प्रशासक अजित पाटील व वैद्यकीय अधिकारी पल्लवी तारळेकर यांच्याशी त्यांनी शहरात उद्भवलेली डेंगी साथीबाबतची सद्यस्थितीची चर्चा केली. मुरगूड व परिसरातील ग्रामस्थांसाठी ५० खाटांचे जिल्हा श्रेणीचे रुग्णालय व्हावे, या मागणीचे निवेदन कार्यकर्त्यांनी दिले. अनंत फर्नांडिस, दत्तामामा खराडे, विलास गुरव, दगडू शेणवी, संजय पाटील, विजय राजिगरे, अमर चौगुले, सुशांत मांगोरे, अनिल अर्जुने आदी उपस्थित होते.

पट्टणकोडोलीत सोमवारी महायज्ञ
पट्टणकोडोली ः येथील श्री क्षेत्र तुळजाभवानी देवस्थान ट्रस्टतर्फे सोमवारी (ता. २९) तुळजाभवानी महायज्ञ व महापूजेचे आयोजन केले आहे. हा विधी आर्थिकदृष्ट्या खर्चिक असल्याने सामान्य लोकांना हा विधी करता येणे शक्य होत नाही. त्यामुळे सामुदायिक स्वरूपात नाममात्र नोंदणी शुल्कात महायज्ञ व महापूजा विधी होणार आहे. इच्छुकांनी शिवाजी हळदे व महादेव जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pkd22b00945 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..