दलित वस्तीचा निधि इतर ठिकाणी खर्च केल्या बाबत केलेले बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दलित वस्तीचा निधि इतर ठिकाणी खर्च केल्या बाबत केलेले बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले.
दलित वस्तीचा निधि इतर ठिकाणी खर्च केल्या बाबत केलेले बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले.

दलित वस्तीचा निधि इतर ठिकाणी खर्च केल्या बाबत केलेले बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले.

sakal_logo
By

०१४१४
पट्टणकोडोली :-बौद्ध विहाराचा तोडगा निघाल्यानंतर कार्यकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.
-------------------------------
पट्टणकोडोलीतील बेमुदत उपोषण मागे
पट्टणकोडोली, ता.१२ : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकासकामांसाठी मंजूर झालेला निधी येथील ग्रामपंचायतीने इतरत्र खर्च केल्याचा आरोप करीत संबंधितांवर कारवाईच्या मागणीसाठी शहर रिपब्लिकन पक्षातर्फे बेमुदत उपोषण केले होते. ३० लाखांतून बौद्ध विहार बांधून देण्याच्या आश्वासनानंतर कार्यकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.
रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, शहराध्यक्ष दीपक भोसले, पोपट कांबळे, सुनील त्रिरत्न आदींनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर पावसातच उपोषणास सुरूवात केली. ग्रामविकास अधिकारी व ठेकेदारांना बोलावून घेत जिल्हा उपाध्यक्ष सतीश माळगे यांनी केलेल्या चर्चेत बौद्ध विहार बांधून देण्याचा तोडगा निघाला. नवमहाराष्ट्र सूत गिरणीचे संचालक गोगा बाणदार यांनी बौद्ध विहारासाठी आमदार प्रकाश आवाडे यांच्यामार्फत वीस लाखांचा निधी देण्याची ग्वाही दिली. त्यानुसार समतानगरात प्रत्यक्ष बौद्ध विहार बांधकामाचा प्रारंभ झाला. यावेळी सरपंच विजया जाधव, उपसरपंच आनंदा पाटील, सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी, अनिल कांबळे, किसन तिरपणकर उपस्थित होते.