साजणीची "संवेदनशील गाव" ओळख पुसून "आदर्श गाव" अशी ओळख निर्माण करणार : निशिकांत पाटील. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साजणीची "संवेदनशील गाव" ओळख पुसून "आदर्श गाव" अशी ओळख निर्माण करणार : निशिकांत पाटील.
साजणीची "संवेदनशील गाव" ओळख पुसून "आदर्श गाव" अशी ओळख निर्माण करणार : निशिकांत पाटील.

साजणीची "संवेदनशील गाव" ओळख पुसून "आदर्श गाव" अशी ओळख निर्माण करणार : निशिकांत पाटील.

sakal_logo
By

फोटो येणार आहे

साजणीला विकासाचे
आदर्श मॉडेल बनविणार ः पाटील

पट्टणकोडोली ता. १४ : साजणीत शाश्वत विकास नाही म्हणूनच युवकांनी एकत्र येऊन तिसऱ्या आघाडीचा पर्याय उभारला आहे. परिवर्तन आघाडीतून लोकनियुक्त सरपंचपदाचे उमेदवार म्हणून उच्चशिक्षित निशिकांत पाटील सरपंचपदाचे उमेदवार आहेत. साजणीला विकासाचे आदर्श मॉडेल म्हणूनच जिल्ह्यात ओळख निर्माण करून देणार, असे पाटील यांनी सांगितले.
निशिकांत यांचे वडील शिक्षक असल्याने जन्मापासूनच संस्काराचे बाळकडू मिळाले. घरात राजकीय लोकांची उठबस असल्याने त्यांना जनसामान्यांचा विकास कसा करावा, याचे धडे त्यांना मिळाले. ग्रामस्थांच्या आरोग्याच्या प्रश्नावर रात्री अप्रतिम धावून गेल्यानेच मतदारांचे प्रेम मला मिळत असल्याची अनुभूती येत आहे.
ते म्हणाले, ‘गाव निसर्ग साधन-संपत्तीने नटलेले आहे. गावापासून हाकेच्या अंतरावर विविध उद्योग आहेत. त्या उद्योगांना पूरक उद्योजक, व्यावसायिक गावातच निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. लक्ष्मी डोंगर आणि मंदिर परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास, डोंगराचा उपयोग सौरऊर्जेच्या निर्मितीसाठी करून मोफत वीज देण्यासाठी विशेष प्रयत्न, शाहूकालीन गावतळ्याचे संवर्धन आणि सुशोभीकरण, ग्रंथालय सुरू करून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांसाठी स्टडी रूम बनवणार, ओपन जिम, योगा सेंटरची निर्मिती करणार. शेतातील पाणंद रस्ते बनवणार. समाज आणि न्यायव्यवस्थेतील तज्ञांची तंटामुक्त समिती स्थापन करून विनाराजकारण तंटे मिटवण्यावर भर देणार. शाश्वत विकासासाठी मतदारांनी संधी द्यावी.
-------------------------------------
माझे व्हिजन
* शासनाकडून गावठाण हद्दवाढ करून घेणार.
* प्राथमिक आरोग्य केंद्रातून अत्याधुनिक सुविधा मिळवून देणार.
* ''एक प्रहर गावासाठी'' चळवळीतून विकास करणार.
* पशुधन वाढीसाठी विशेष लक्ष देणार.
* बालकलाकार, खेळाडू आणि भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्याची स्पर्धा भरवून प्रोत्साहनपर अनुदान देणार.
* सीसीटीव्ही बसवून गाव सुरक्षित करणे, माता-भगिनींसाठी निर्भया पथक स्थापना करणे.
* आठवडी बाजाराचे नियोजनाने शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणार.
* ग्रामस्थांच्या समस्यांच्या निराकरणासाठी जनता दरबार भरवणे