पट्टणकोडोलीत शूरवीरांना मानवंदना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पट्टणकोडोलीत शूरवीरांना मानवंदना
पट्टणकोडोलीत शूरवीरांना मानवंदना

पट्टणकोडोलीत शूरवीरांना मानवंदना

sakal_logo
By

पट्टणकोडोलीत
शूरवीरांना मानवंदना
पट्टणकोडोली ः येथे शौर्य दिनानिमित्त शहीद झालेल्या शूर वीरांना मानवंदना दिली. येथे समता सैनिक दलाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष रमेश जाधव व बाळासो कांबळे यांच्याहस्ते या शूरवीरांना पुष्पचक्र अर्पण केले. सरपंच भाग्यश्री कोळी यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर बौद्ध गाथा व संविधानाचे वाचन केले. रमेश जाधव, शशिकांत खांडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. हुपरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज गिरी, नूतन ग्रामपंचायत सदस्य यांच्याहस्ते शूरवीरांना पुष्प वाहण्यात आली. नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार बौद्ध समाजातर्फे केला. सूत्रसंचालन दगडू कांबळे यांनी केले. सिद्धार्थ कांबळे, प्रशिक त्रिरत्न, मिलिंद यादव, पोपट कांबळे, सागर कांबळे,प्रवीण भाटणवाडे,अनिल कांबळे ,देवानंद कांबळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.