पट्टणकोडोलीत हरिनाम सप्ताह सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पट्टणकोडोलीत हरिनाम सप्ताह सुरू
पट्टणकोडोलीत हरिनाम सप्ताह सुरू

पट्टणकोडोलीत हरिनाम सप्ताह सुरू

sakal_logo
By

पट्टणकोडोलीत हरिनाम सप्ताह सुरू
पट्टणकोडोली ः येथील श्री विठ्ठल-बिरदेव देवस्थान व समस्त पुजारी-धनगर समाजतर्फे बिरदेव जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विठ्ठल-बिरदेव मंदिरामध्ये श्री विठ्ठल-बिरदेव महात्म्य ग्रंथ, ग्रंथराज ज्ञानेश्वरी व अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे.
पहाटे ४ ते ६ काकड आरती, सकाळी ८ ते ११ श्री विठ्ठल-बिरदेव महात्म्य ग्रंथ व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १२.३० प्रसाद, दुपारी ३ ते ५ महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम, सायंकाळी ५ ते ६.३० हरिपाठ, ६.३० ते ७.३० प्रवचन, रात्री ७.३० ते ८ आरती, ८ ते १० किर्तन, १० ते ११ प्रसाद, रात्री ११ ते पहाटे ३ हरिजागर व भजन असे दैनंदिन कार्यक्रम होत आहेत. मंगळवारी (ता.९) सकाळी ७ वाजता बिरदेव जन्मोत्सव पुष्पवृष्टी, १० ते १२ वाजेपर्यंत सुभाष शिंगे महाराज (नागाव) यांचे काल्याचे किर्तन आणि १२ वाजता महाप्रसाद वाटप करुन सप्ताहाची सांगता होणार आहे.