पट्टणकोडोली पोट निवडणूक सहा महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आली. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पट्टणकोडोली पोट निवडणूक सहा महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आली.
पट्टणकोडोली पोट निवडणूक सहा महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आली.

पट्टणकोडोली पोट निवडणूक सहा महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आली.

sakal_logo
By

पट्टणकोडोलीतील ग्रा.पं.पोटनिवडणूक
सहा महिन्यांसाठी पुढे ढकलली

पट्टणकोडोली : हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी एकही उमेदवारी अर्ज न आल्याने ही निवडणूक सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आली. सन २०२३ ते २८ या सालासाठी ग्रामपंचायत निवडणूक डिसेंबर महिन्यात झाल्या होत्या. यामध्ये सरपंच पद व प्रभाग चार मधील सदस्य पद हे अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव होते. या दोन्ही जागांवर भाग्यश्री कोळी यांनी आपले नशीब अजमावले होते. त्यात त्यांना दोन्ही ठिकाणी यश मिळाले. त्यांनी सरपंचपदावर विराजमान होत प्रभाग चारमधील सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक लागली होती. मात्र या जागेसाठी एक ही अर्ज न आल्याने ही निवडणूक सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार अनुसूचित जमाती लोकसंख्येच्या विचार करून या ठिकाणी महिला आरक्षण ठेवण्यात आले आहे. जर या आरक्षणातील जातीचे दाखले नसतील तर, गावावर हे आरक्षण का लादले आहे? असा सवाल ग्रामस्थांतून विचारला जात आहे.