जगन्नाथ मंदिराच्या संरक्षक भिंतीवर ट्रकची धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जगन्नाथ मंदिराच्या संरक्षक भिंतीवर ट्रकची धडक
जगन्नाथ मंदिराच्या संरक्षक भिंतीवर ट्रकची धडक

जगन्नाथ मंदिराच्या संरक्षक भिंतीवर ट्रकची धडक

sakal_logo
By

01570

तळंदगे ः जगन्नाथ मंदिराच्या संरक्षक भिंतीवर ट्रकची धडक बसून ट्रक आत घुसला.
...

तळंदगेत मंदिराच्या संरक्षक भिंतीला ट्रकची धडक

पट्टणकोडोली ः तळंदगे (ता.हातकणंगले) येथील ग्रामदैवत श्री जगन्नाथ मंदिराच्या संरक्षक भिंतीवर ट्रकची धडक बसून ट्रक आत घुसला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील एका फाउंड्री कारखान्यातून फाउंड्रीचे साहित्य घेऊन तळंदगेकडे येणाऱ्या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक जगन्नाथ मंदिराच्या संरक्षक भिंतीवर जोराने आदळला. त्यामुळे तेथील भिंत फोडून ट्रक आत घुसला होता. तळंदगेतील ग्रामदैवत श्री जगन्नाथ व अंबाबाई मंदिराचा कलशारोहण सोहळा शनिवारपासून सुरू झाला आहे. मंदिर परिसरात कुंकूमार्चन सोहळा असल्याने हजारो महिला तिथे उपस्थित होत्या. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.