
‘अकाउंटिंग’साठी व्यावहारिक ज्ञान गरजेचे
चौकटीत वापरणे......
क्यू आर कोड आहे....
--------------
‘अकाउंटिंग’साठी
गरजेचे व्यावहारिक ज्ञान
सध्याच्या शैक्षणिक स्पर्धेच्या काळात पुढे जाण्यासाठी लागणारे कौशल्य व व्यावहारिक ज्ञान पदवीधर असणाऱ्यांकडे असणे फार गरजेचे आहे. असं म्हटलं जातं यशाला शॉर्टकट नसतो. यश मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न यासोबतच योग्य मार्गदर्शन आणि योग्य वेळी योग्य निर्णय यांची आवश्यकता असते. कुठले क्षेत्र निवडावे यात चुकामुक झाल्यास त्यानंतर येणारी निराशा आत्मविश्वास कमी करू शकते. आपण कुठे कमी पडलो याचा अभ्यास करून, चालू काळात कोणते क्षेत्र रोजगारदेय आहे व त्यासाठी कुठले व्यावसायिक प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे याचा शोध घेत राहणे गरजेचे असते.
केवळ विद्यापीठाची पदवी बाळगणे सध्या पुरेसे नाही याचा स्वीकार करून मार्केट रिसर्च करत सध्या जे व्यावहारिक ज्ञान गरजेचे आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. यासाठी इंडस्ट्री रिलेटेड कंटेंट असणारा अभ्यासक्रम, इंडस्ट्रीमधील चालू परिस्थितीतील असाईनमेंट्सना सामोरे जाणारी संधी, इंडस्ट्री एक्स्पर्ट्सद्वारे होणारे मास्टर क्लास आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यास प्रोजेक्ट अशा प्रॅक्टिकल प्रक्रियेद्वारे होणारे संपूर्ण व्यावहारिक प्रशिक्षण गरजेचे आहे. मुलाखतींना सामोरे जाताना पदवी व थिअरीपेक्षा उमेदवारांकडे असणारे प्रॅक्टिकल नॉलेज तपासले जाते.
असेच एक क्षेत्र ज्याला थिअरीसोबतच व्यावहारिक ज्ञानाची व अनुभवाची गरज असते ते म्हणजे अकाउंटिंग. या क्षेत्रात करिअरच्या संधी नेहमीच उपलब्ध असतात कारण लेखापरीक्षण हे प्रत्येक व्यावसायिक संस्थेसाठी आणि उद्योगासाठी अत्यंत गरजेची गोष्ट आहे. हे जगातील एक प्रतिष्ठित व शीर्षस्थ करिअर आहे. प्रत्येक संस्था वा कंपनीला एका अशा व्यक्तीची गरज असते जी कंपनीच्या आर्थिक नोंदी सांभाळण्याचे व व्यवस्थापित करण्याचे काम करते. या पदाला अकाउंटंट म्हणजे मराठीमध्ये लेखापाल म्हटले जाते.
अकाउंटिंगमधील नोकऱ्यांमध्ये प्रवेश स्तरापासून कार्यकारी स्तरापर्यंत वाढ होऊ शकते. पेरोल, ऑडिटिंग आणि आर्थिक व्यवस्थापनासाठी संस्थेचा हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. विविध कंपन्यांमध्ये स्वतंत्र लेखापरीक्षणाच्या मागणीमध्ये वाढ झाल्याने अकाउंटंट्सची मागणी वाढत आहे. पात्र उमेदवारांना सार्वजनिक, खासगी अथवा ना-नफा उद्योग व कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते.
या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करा.-----६१८७३
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59902 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..