
अंबानी हॉस्पिटलमध्ये तिसरी रोबोटिक सर्जिकल सिस्टिम
फोटो - 61938
मुंबई ः कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये वापरण्यात येत असलेली तिसरी ‘दा विंची रोबोटिक सर्जिकल सिस्टीम’.
अंबानी हॉस्पिटलमध्ये तिसरी
रोबोटिक सर्जिकल सिस्टीम
पुणे, ता. ४ : मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने (केडीएएच) आपली तिसरी ‘दा विंची रोबोटिक सर्जिकल सिस्टीम’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. हे देशातील पहिले असे रुग्णालय आहे की, तेथे तीन ‘दा विंची रोबोट्स’ आहेत. या रुग्णालयात जून २०१२ मध्ये ‘दा विंची रोबोटिक सिस्टीम’सह रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू झाल्या असून रोबोटच्या मदतीने वेगवेगळ्या स्पेशालिटीजमध्ये सुमारे ४ हजार ५०० पेक्षा जास्त शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
झालेल्या शस्त्रक्रियांत मोठ्यांसाठी तसेच मुलांसाठी यूरोलॉजी, स्त्री रोग, नाक, कान व घसा आणि बेरिएट्रिक शस्त्रक्रियेसहित यूरो- ऑन्कोलॉजी, महिलांना होणारे कॅन्सर, डोके व मानेचे कॅन्सर, फुफ्फुसे व अन्नव्यवस्थेतील व कोलोरेक्टल कॅन्सर यांच्यावरील उपचारांसाठी केल्या जाणाऱ्या कॅन्सर शस्त्रक्रियांचा समावेश आहे. देशात आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणण्यात कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नेहमीच आघाडीवर असते. या रुग्णालयात प्रोस्टेट, किडनी आणि मूत्राशयाच्या कॅन्सरच्या रुग्णांवरील उपचारांसाठी २६०० पेक्षा जास्त रोबोटिक शस्त्रक्रिया पूर्ण करण्याचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. हॉस्पिटलच्या रोबोटिक सर्जरीचे हेड आणि युरो-ऑन्कोलॉजीचे कन्सल्टन्ट डॉ. टी. बी. युवराजा म्हणाले, ‘‘पारंपरिक ओपन सर्जरीच्या तुलनेत कितीतरी जास्त लाभ प्रदान करणारी रोबोटिक शस्त्रक्रिया सर्जिकल क्षेत्रात एका नव्या युगाचे प्रतिनिधित्व करत आहे.’’
हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संतोष शेट्टी म्हणाले, ‘‘आमच्या सर्जन्सना आधुनिक रोबोटिक तंत्रांचा उपयोग करून विविध स्थितींचे निदान व त्यावरील उपचारांचे प्रशिक्षण देण्यावर आम्ही सातत्याने भर देत आलो आहोत. आमच्या या दूरदर्शी धोरणामुळे हजारो रुग्णांना रोबोटिक सर्जरीचे लाभ मिळाले आहेत. पारंपरिक शस्त्रक्रियेच्या तुलनेत रोबोटिक शस्त्रक्रियेच्या खर्चात कमी आहे.’’
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59941 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..