कौशल्य विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी डॉ. अपूर्वा पालकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कौशल्य विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी डॉ. अपूर्वा पालकर
कौशल्य विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी डॉ. अपूर्वा पालकर

कौशल्य विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी डॉ. अपूर्वा पालकर

sakal_logo
By

कौशल्य विद्यापीठाच्या प्रथम
कुलगुरूपदी डॉ. अपूर्वा पालकर
पुणे, ता. २७ : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरूपदी डॉ. अपूर्वा पालकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्रालयाने बुधवारी या संबंधीची अधिसूचना निर्गमित केली आहे.
 डॉ. पालकर सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेजेस या केंद्राच्या संचालक म्हणून कार्यरत आहे. अहमदाबाद येथील इंडियन इस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) मधून ‘व्यवसाय प्रशासन’ या विषयात डॉ. पालकर पदवीधर आहेत. मागील दोन दशकांहून अधिक काळ व्यवसाय प्रशासन विषय त्या शिकवत असून, या क्षेत्रात त्या संशोधनही करत आहे. व्यवस्थापन विज्ञान अभ्यासक्रमांसाठी अखिल भारतीय प्रवेश परीक्षा आयोजित करणाऱ्या समितीच्या प्रमुख म्हणूनही त्या सक्रिय होत्या. राज्य सरकारने स्थापन केलेल्या शिक्षण समित्यांमध्येही डॉ. पालकर यांचा सहभाग आहे. ‘सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही डॉ. पालकर यांनी काम पाहिले होते. या दरम्यानच त्यांना प्रतिष्ठित रवी जे मथाई नॅशनल फेलोशिप अवॉर्ड मिळाला होता. पुढील दोन वर्षांसाठी ही निवड करण्यात आली आहे.
२०१७ मध्ये तत्कालीन केंद्रीय कौशल्य आणि उद्योजकता विकास राज्यमंत्री राजीव प्रताप रूडी यांनी देशातील पहिले कौशल्य विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून प्रलंबित असलेल्या कौशल्य विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी १४ एप्रिल २०२१ रोजी करण्यात आली. अखेरीस या विद्यापीठाला डॉ. पालकर यांच्या रूपाने पहिल्या कुलगुरू मिळाल्या आहे. 
महाराष्ट्रात असलेले उद्योग समूहांचे मोठे जाळे व रोजगाराच्या प्रचंड संधी विचारात घेता राज्यात सार्वजनिक कौशल्य विद्यापीठाची स्थापना करणे आवश्यक होते. उद्योगांच्या मागणीनुसार तांत्रिक क्षमता आणि विविध कौशल्यप्राप्त मनुष्यबळ निर्माण व्हावे, असा कौशल्य विद्यापीठ स्थापनेचा उद्देश आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83972 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..