आयकॉन स्टीलची यशोगाथा आज साम टीव्हीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयकॉन स्टीलची यशोगाथा आज साम टीव्हीवर
आयकॉन स्टीलची यशोगाथा आज साम टीव्हीवर

आयकॉन स्टीलची यशोगाथा आज साम टीव्हीवर

sakal_logo
By

आयकॉन स्टीलची यशोगाथा
आज साम टीव्हीवर
पुणे, ता. २ : स्टील उद्योगातील महाराष्ट्राचा ‘आयकॉन’ असलेल्या ‘आयकॉन स्टील’ची यशोगाथा ‘महाब्रँड्स’मधून मांडण्यात येणार आहे. महाराष्ट्रीय ब्रँड्ना सलाम करणारा हा कार्यक्रम साम टीव्हीवर प्रसारित केला जाणार आहे. त्या अंतर्गत बुधवारी (ता. ३) दुपारी तीन वाजून २५ मिनिटांनी ‘आयकॉन स्टील’चा प्रवास साम टीव्हीवर प्रसारित केला जाईल. देशात अनेक ठिकाणी स्टील उद्योग सुरू आहेत. या स्टील उद्योगांमध्ये ‘जालना स्टील उद्योग’ देशात अग्रेसर आहे. येथील स्टील उद्योगातून देशासह परदेशात स्टील जाते. परंतु हे वैभव एका दिवसात प्राप्त झालेले नाही, त्याच्या पाठीमागे खूप कष्ट आहेत. याच गुणवत्तेच्या जोरावर स्टील उद्योगात मागील ३० वर्षांपासून राज्यात, देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘आयकॉन स्टील’चा डंका साता समुद्रापार वाजत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86038 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..