सतेज पाटील प्रेस सातारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सतेज पाटील प्रेस सातारा
सतेज पाटील प्रेस सातारा

सतेज पाटील प्रेस सातारा

sakal_logo
By

केंद्राच्या धोरणांमुळे लोकशाही
धोक्यात ः सतेज पाटील
---
मंत्रिमंडळ विस्तारासाठी मोर्चे काढण्याची वेळ
सातारा, ता. ४ : केंद्र सरकारच्या जीएसटी आणि इतर सरकारी चुकीच्या धोरणांमुळे देशात महागाई वाढली आहे. काही यंत्रणांचा गैरवापर होत असून, त्यामुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे, अशी टीका माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, महाराष्ट्रात मंत्रिमंडळ स्थापन व्हावे, यासाठी आम्हालाच राज्यात मोर्चे काढावे लागतील, असा उपरोधिक टोला त्यांनी शिंदे व भाजप युतीला लगावला.
जिल्ह्यात ९ ते १५ ऑगस्टदरम्यान काँग्रेसने ७५ किलोमीटरची आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन केले आहे, असे सांगून श्री. पाटील म्हणाले, ‘‘आझादी गौरव पदयात्रेची सुरुवात ९ ऑगस्टला कोल्हापूर नाका (कऱ्हाड) येथून सुरू होईल. ११ तालुक्यांत किमान पाच ते १५ किलोमीटर पदयात्रा होणार आहे. पदयात्रेत जनसंवाद व काँग्रेसने भारतीय स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान आणि त्यातील लोकशाहीचा विचार लोकांपर्यंत पोचविला जाईल.’’ श्री. पाटील म्हणाले, ‘‘केंद्राने जीएसटी कक्षेत जीवनावश्यक वस्तू आणून महागाई वाढविली आहे. यंत्रणांचा चुकीच्या वापरामुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. म्हणूनच काँग्रेसची सातत्याने संघटनात्मक पातळीवर आंदोलने सुरू आहेत. नैतिक जबाबदारी म्हणून काँग्रेस व्यापक जनआंदोलन उभे करीत आहे. पेट्रोल, डिझेल महागाईविरुद्ध आंदोलन सुरू आहे. महागाई विरुद्ध आज सरकार बोलायला तयार नाही.’’
अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर असल्याचा त्यांनी इन्कार करताना ही अफवा असून, एकनाथ शिंदेंवर दबाव टाकून अफवा पसरविण्याचे काम भाजपची मंडळी करीत असल्याची टीका केली. शिंदेंचे हे सरकार टिकेल का, हे येत्या ८ ऑगस्टला कळेल. आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसचे संपर्क दौरे सुरू आहेत. आम्ही स्थानिक नेत्यांशी चर्चा करून निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करणार असून, शक्य असेल तेथे महाविकास आघाडीबरोबर जाऊ. आघाडी नसेल तेथे स्वतंत्रपणे लढण्याची तयारी काँग्रेसने केली आहे, असे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.

...............

चौकट
------
किमान अकराची टीम तरी करा...
राज्यात सरकार स्थापन होऊन ३५ दिवस झाले तरी मंत्रिमंडळ स्थापन झालेले नाही, याविषयी ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या दोघांवर राज्य चालविणे योग्य नाही, कारण हा काही गोवा नाही. महाराष्ट्र मोठे राज्य आहे. राज्यात
मंत्रिमंडळ स्थापन व्हावे म्हणून आता काँग्रेसला मोर्चे काढावे लागतील. विस्ताराची ‘तारीख पे तारीख’ सुरू असून, एकनाथ शिंदेंनी मंत्रिमंडळाचा लवकरात लवकर विस्तार करावा. किमान प्रत्येकाचे पाच-पाच मंत्री तरी करावेत. तेही होत नसेल तर ११ जणांची टीम करावी.’’

................

PNE22S82360
सतेज पाटील

------------पूर्ण--------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86795 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top