चाहत दलाल ‘द गॅलेक्सी’च्या मानकरी किताब मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय महिला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाहत दलाल ‘द गॅलेक्सी’च्या मानकरी
किताब मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय महिला
चाहत दलाल ‘द गॅलेक्सी’च्या मानकरी किताब मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय महिला

चाहत दलाल ‘द गॅलेक्सी’च्या मानकरी किताब मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय महिला

sakal_logo
By

84385

चाहत दलाल ठरल्या
‘द गॅलेक्सी’च्या मानकरी

पुणे, ता. १० : अमेरिकेतील टेक्सास राज्यातील मॅकअलेन येथे पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या ‘द गॅलेक्सी-२०२३’ सौंदर्यवती स्पर्धेत पुण्यातील कॅप्टन चाहत दलाल यांनी ‘द गॅलेक्सी- २०२३’ ही स्पर्धा जिंकली. हा किताब मिळविणाऱ्या व विजेत्या स्पर्धकाचा मुकुटधारण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत.
मिसेस गॅलेक्सी २०२१-२२ क्रिस्टल केव्हीकडून त्यांनी हा मानाचा मुकुट स्वीकारला. ‘तुमची स्वप्ने साध्य करण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो. तुम्ही तुमची स्वप्न कधीही पूर्ण करू शकता,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी या यशानंतर माध्यमांशी बोलताना दिली.
जूनमध्ये झालेल्या मिसेस इंडिया इंटरनॅशनल स्पर्धेतही चाहत यांनी उपविजेतेपद पटकावले होते. द गॅलेक्सी या स्पर्धेची सुरुवात चाहत यांच्या उत्तम कामगिरीने झाली. स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात तीन फेऱ्या होत्या. त्या चाहत यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. त्यानंतर या स्पर्धेत मुलाखत फेरीत कॅप्टन चाहत यांनी आत्मविश्वासाने सादरीकरण करीत परीक्षकांचे पहिल्या क्रमांकाचे मत मिळवित स्पर्धा जिंकली. चाहत यांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसह सर्वोत्कृष्ट मुलाखत, मोस्ट फोटोजेनिक आणि सर्वोत्कृष्ट स्विम सूट या गटातील विजेतेपददेखील पटकावले. त्यांचा या स्पर्धेसाठीचा हा प्रवास ‘अर्बेन जेटस्‌’ने प्रायोजित केला होता.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d89804 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..