पाटण कोयना पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाटण कोयना पाऊस
पाटण कोयना पाऊस

पाटण कोयना पाऊस

sakal_logo
By

कोयना धरणातून आज विसर्ग वाढविणार
पाटण, ता. १३ ः कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पुढील तीन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. धरणाचा एकूण साठा ९२.५९ टीएमसी झाला असून, गेल्या २४ तासांत जलाशयाच्या साठ्यात ३.६२ टीएमसी वाढ झाली आहे. धरणात होणारी आवक लक्षात घेऊन उद्या (ता. १४) सकाळी दहाला धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटावरून साडेचार फुटांवर उचलले जाणार आहेत. त्यामुळे कोयना नदीपात्रात ३० हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असून, नदीकाठावरील गावांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार यांनी केले आहे.
आज सायंकाळी पाचला धरणाची पाणी पातळी २१५ फूट आठ इंच झाली असून, धरणात ९२.५९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. काल (ता. १२) सकाळी दहाला धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटाने उचलून पायथा वीजगृहासह १० हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, जलाशयाच्या साठ्यात गेल्या २४ तासांत ३.६२ टीएमसी वाढ झाली आहे. दीड फूट उचललेल्या दरवाजातून आठ हजार क्युसेक होणारा विसर्ग साठा वाढल्यने एक हजार ५९६ क्युसेकने वाढला असून, पायथा वीज गृहासह एकूण ११ हजार ६९६ क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे.
साडेचार फुटांनी धरणाचे दरवाजे उचलले, तर कोयना नदीच्या पातळीत वाढ होणार आहे. तीस हजार क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू झाला, तर संगमनगर धक्का येथील जुना पूल, मूळगाव पूल उद्या सायंकाळपर्यंत पाण्याखाली जाईल. संगमनगर धक्का पुलाला पर्यायी नवीन पूल सेवेत दाखल आहे. मात्र, मूळगाव पूल पाण्याखाली गेला, तर या मार्गावरील वाहतूक ठप्प होईल.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d89897 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..