सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी
सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी

सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी

sakal_logo
By

लोगो- एसआयआयएलसी
फोटो- 97890

सिव्हिल इंजिनिअरिंगच्या
विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी
पुणे, ता. ८ ः सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेतून दरवर्षी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडत आहेत. पदवी घेऊन चांगल्या पगाराच्या नोकरीची अपेक्षा असणारे तरुण-तरुणी नोकरीअभावी एकतर स्पर्धा परीक्षा देत आहेत किंवा मॅनेजमेंट क्षेत्रातील पुढील शिक्षणासाठी प्रयत्न करीत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असणाऱ्या पदवीधरांपर्यंत रिअल इस्टेटसारख्या क्षेत्रात नोकऱ्यांच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत, ही माहिती पोचत नाही.
गेल्या काही वर्षांत रिअल इस्टेट क्षेत्र वेगाने वाढले आहे. या क्षेत्रात लाखो लोकांना रोजगार देण्याची क्षमता आहे. पण, कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळाचा यात अभाव आहे. बाजारपेठेत लागणाऱ्या कौशल्यांची मागणी पूर्ण करणाऱ्या अभियंत्यांना या क्षेत्रात सहज नोकऱ्या मिळतात. तांत्रिक नोकऱ्यांव्यतिरिक्त रिअल इस्टेटमध्ये सेल्स, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेव्हलपमेंट, कस्टमर सर्व्हिस, सिव्हिल साइट सेल्स इंजिनिअर या विभागात भरपूर संधी उपलब्ध आहेत.
‘सकाळ’ संलग्न संस्था एसआयआयएलसी व इन्स्टिट्यूट ऑफ रिअल इस्टेट ॲण्ड फायनान्स (IREF) या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘रिअल इस्टेट मार्केटिंग ॲण्ड मॅनेजमेंट’ हा ट्रेनिंग प्रोग्रॅम राबविला जाणार आहे. या योजनेसाठी प्लेसमेंट पार्टनर म्हणून पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रातील आघाडीला असणाऱ्या नाईकनवरे डेव्हलपर्स, रिलेशन रिअल टेक, प्रॉप बायिंग, रेडो कन्सल्टिंग एलएलपी आदी कंपन्या आहेत. सहा महिन्यांच्या ट्रेनिंगदरम्यान स्टायपेंडसह थेट साईट्सवर प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाईल. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर चांगल्या पगाराची नोकरी मिळण्यासाठीचे खात्रीशीर प्लेसमेंट सहाय्य आयोजकांतर्फे मिळणार आहे.
सिव्हिल इंजिनिअरिंग पदवीधर व इंजिनिअरिंग कॉलेजेसमधील ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर्स (TPO) यांनी या अभिनव योजनेशी जोडून घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : ८४८४९२६४७५.