एलआयसीची धनवर्षा ही नवी योजना दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एलआयसीची धनवर्षा ही नवी योजना दाखल
एलआयसीची धनवर्षा ही नवी योजना दाखल

एलआयसीची धनवर्षा ही नवी योजना दाखल

sakal_logo
By

फोटो येणार आहे.........

मुंबईः एलआयसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एम.आर. कुमार यांच्या हस्ते सोमवारी ‘धन वर्षा’ ही नवीन योजना सादर करण्यात आली. यावेळी एलआयसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

एलआयसीची नवी
धनवर्षा योजना दाखल
मुंबई, ता. १ ः भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने धनवर्षा ही नवी योजना नुकतीच सादर केली आहे. ही एक नॉन-लिंक्ड, एकल प्रीमियम योजना आहे असून संरक्षण आणि बचत यांचा उत्तम मिलाफ यात साधण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत म्हणजेच ३१ मार्च, २०२३ पर्यंत ही योजना गुंतवणुकीसाठी उपलब्ध असेल. मुदतीदरम्यान विमाधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. तर मुदत पूर्ण झाल्यानंतर अंतिम तारखेला हमी दिलेली एकरकमी रक्कम विमाधारकाला दिली जाते.

विमाधारकाला १० वर्षे किंवा १५ वर्षांसाठी मुदत निवडीचा पर्याय उपलब्ध असून १० वर्षांच्या मुदतीसाठी प्रवेशाचे किमान वय आठ वर्षे आणि १५ वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी किमान वय तीन वर्षे तर कमाल वय ३५ ते ६० वर्षे आहे. किमान मूळ विमा रक्कम १,२५००० रुपये असून, कमाल मूळ विमा रकमेसाठी कोणतीही मर्यादा नाही. प्रवेशाच्या वेळी वय आठ वर्षांपेक्षा कमी असल्यास, जोखीम पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून दोन वर्षांनी सुरू होईल, तर आठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी, पॉलिसी जारी केल्याच्या तारखेपासून जोखीम त्वरित सुरू होईल.या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू आणि अपंगत्वाचा लाभ असे दोन रायडर उपलब्ध असून काही अटींच्या अधीन राहून कर्ज सुविधाही मिळते. एजंट किंवा इतर मध्यस्थांमार्फत ही योजना ऑफलाइन खरेदी करता येईल, तसेच www.licindia या वेबसाइटद्वारे थेट ऑनलाइन खरेदी केली जाऊ शकते.

००००००
फोटो ओळ- मुंबईः एलआयसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एम.आर. कुमार यांच्या हस्ते सोमवारी ‘धन वर्षा’ ही नवीन योजना सादर करण्यात आली. यावेळी एलआयसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.