फोक्सवॅगन टायगुनला फाइव्ह स्टार सुरक्षा रेटिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोक्सवॅगन टायगुनला फाइव्ह स्टार सुरक्षा रेटिंग
फोक्सवॅगन टायगुनला फाइव्ह स्टार सुरक्षा रेटिंग

फोक्सवॅगन टायगुनला फाइव्ह स्टार सुरक्षा रेटिंग

sakal_logo
By

3657 - फोक्सवॅगनची ‘टायगुन’

फोक्सवॅगन टायगुनला
फाइव्ह स्टार सुरक्षा रेटिंग
पुणे, ता. ८ ः ‘‘सुरक्षा, दर्जा आणि कार चालवताना मिळणारा आनंद ही फोक्सवॅगन या ब्रॅण्डची वैशिष्ट्ये आहेत आणि आमचे मुख्य ध्येय या सुविधांमध्ये कोणतीही तडजोड न करता देणे हेच असते. आज हे जाहीर करताना आम्हाला अभिमान वाटतो आहे, की आमच्या जर्मन इंजिनिअरिंगच्या मदतीने बनलेल्या व ४०पेक्षा अधिक सुरक्षा सुविधा असलेल्या ‘टायगुन’ या एसयुव्हीडब्ल्यूने फाइव्ह स्टार रेटिंग प्राप्त केले आहे,’’ असे फोक्सवॅगनचे ब्रॅण्ड डायरेक्टर आशिष गुप्ता यांनी सांगितले.
फाइव्ह स्टार रेटिंग हे ग्लोबल एनसीएपी रेटिंग प्रौढ व लहान मुलांसाठी दिलेल्या सुविधांसाठी आहे. हे रेटिंग आम्ही आमच्या भारतातील ग्राहकांना देऊ करीत असलेल्या अत्युच्च दर्जाच्या सुरक्षेच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. हे आमच्या इंजिनिअरिंगमधील तज्ज्ञ असलेल्या टिमचे व त्यांनी टायगुनला भारतातील सर्वांत सुरक्षित एसयुव्हीडब्ल्यू बनवण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांचेही द्योतक आहे. आम्ही भारतीय ग्राहकांना पुरवीत असलेली सुरक्षा, विश्वासार्हता आणि त्यांच्यापर्यंत पोचण्याची क्षमता यांमुळे हे यश मिळाले आहे, असेही आशिष गुप्ता यांनी सांगितले.