लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून तरुणीचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून तरुणीचा खून
लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून तरुणीचा खून

लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून तरुणीचा खून

sakal_logo
By

लग्नास नकार, तरुणीचा खून
पुणे, ता. ९ : लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून महाविद्यालयीन तरुणीचा खून केल्याची खळबळजनक घटना औंध परिसरात बुधवारी घडली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस फरारी आरोपीचा शोध घेत आहेत. श्वेता रानवडे (वय २२, रा. औंध) असे मृत तरुणीचे नाव आहे. या संदर्भात वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार ‌वाघचवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वेताची संशयित प्रतीक ढमाले (वय २५) याच्याशी ओळख होती. ते दोघे विवाह करणार होते; परंतु तरुणाची वागणूक चांगली नसल्यामुळे श्वेताने त्याला लग्नास नकार दिला होता. त्यामुळे संशयिताने बुधवारी दुपारी औंध जकात नाका परिसरातून जात असलेल्या या तरुणीला अडवून तिच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्यात ही तरुणी गंभीर जखमी झाली. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाला आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
-------