नागरी सहकारी बँकांसाठी मेळावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागरी सहकारी बँकांसाठी मेळावे
नागरी सहकारी बँकांसाठी मेळावे

नागरी सहकारी बँकांसाठी मेळावे

sakal_logo
By

नागरी सहकारी बँकांसाठी
२३ कोल्हापुरात मेळावा
रिझर्व्ह बँकेच्या नियम, निकषाची मिळणार माहिती
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ११ : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) निश्‍चित केलेल्या निकषानुसार कर्ज व्यवहार हाताळणे, सभासद वाढवणे यांसह रिझर्व्ह बँकेचे नवे नियम, परिपत्रके समजावून सांगण्यासाठी सहकार खात्याच्या वतीने राज्यभरात मेळावे सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये २३, २४ आणि २५ नोव्हेंबरला मेळावे आयोजित केले जाणार आहेत.
रिझर्व्ह बँकेकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या नियम बदलांची माहिती बँकांपर्यंत पोहतच नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर सहकार आयुक्तालयाने ही मोहीम हाती घेतली आहे. या सर्व कामकाजाची माहिती नागरी सहकारी बँकांना होण्यासाठी जनजागृती मेळावे घेण्यात येत असून सोलापूर जिल्ह्यात नुकताच मार्गदर्शनपर मेळावा घेण्यात आला आहे. २३ नोव्हेंबरला कोल्हापूर, २४ नोव्हेंबरला सांगली आणि २५ नोव्हेंबरला सातारा जिल्ह्यात हे मेळावे आयोजित केले आहेत. त्यानंतर मुंबई, पुणे आणि नाशिकसह राज्यभरात हे मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. बँकेच्या संचालकांमध्ये रिझर्व्ह बँकेच्या नियमांबाबत माहिती देऊन जनजागृती करण्याचे काम या मेळाव्याच्या माध्यमातून केले जात आहे, असे नागरी सहकारी बँकांचे उपनिबंधक अनंत कटके म्हणाले.
कोट
सहकारी बँकांमध्ये व्यावसायिकता आणायची असल्यास या बँकांच्या संचालकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. रिझर्व्ह बँक ही एक नियंत्रणात्मक संस्था आहे. त्यांना अपेक्षित पद्धतीने संचालक मंडळाने काम करणे ही काळाची गरज आहे. सहकार खात्याने त्या दृष्टीने सुरू केलेला हा उपक्रम चांगला आहे. यातून सहकारी बँकांची निर्णय प्रक्रिया सुधारण्यास नक्कीच मदत होईल.
- विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, महाराष्ट्र अर्बन बँक्स फेडरेशन
कोट
या मेळाव्यांच्या माध्यमातून रिझर्व्ह बँकेचे नियम, कर्ज व्यवहार हाताळणे, सभासद वाढवणे, क्रेडिट मॉनिटरिंग सिस्टीम आदींबाबत नागरी सहकारी बँकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांशी स्पर्धेत सहकारी बँका टिकल्या पाहिजेत. त्यासाठी त्यांच्या कामकाजात सुधारणा करावीच लागेल.
- अनिल कवडे, सहकार आयुक्त