कऱ्हाड भूकंपाचा सौम्यधक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कऱ्हाड भूकंपाचा सौम्यधक्का
कऱ्हाड भूकंपाचा सौम्यधक्का

कऱ्हाड भूकंपाचा सौम्यधक्का

sakal_logo
By

संगमेश्वर परिसरात
भूकंपाचा सौम्य धक्का
कऱ्हाड, ता. १५ ः सातारा व रत्नागिरी जिल्ह्यांत भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. कोयना व संगमेश्वर परिसरात आज सकाळी ९ वाजून २६ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.१ एवढी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगरपासून २८ किलोमीटरवर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरच्या आग्नेयेस १३ किलोमीटरवर होता. मागील महिन्यात कोयना परिसरात २.८ रिश्टर स्केलचा धक्का बसला होता. त्यानंतर आजचा दुसरा धक्का बसला आहे. आजच्या भूकंपाची खोली १६ किलोमीटरवर आहे, अशी माहिती कोयनानगर येथील भूकंप मापन केंद्रातून देण्यात आली. धक्क्याने कोणतीही हानी झाली नसल्याचे पाटण तहसीलदार कार्यालयातून सांगितले.