राज्यात पावसाचा जोर वाढणार दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथे ऑरेंज अलर्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात पावसाचा जोर वाढणार
दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथे ऑरेंज अलर्ट
राज्यात पावसाचा जोर वाढणार दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथे ऑरेंज अलर्ट

राज्यात पावसाचा जोर वाढणार दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथे ऑरेंज अलर्ट

sakal_logo
By

सिंधुदुर्गात
ऑरेंज अलर्ट
पुणे, ता. ३ : राज्यात जुलैपासून सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असून, सोमवारपासून राज्यातील बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. सोमवारी (ता. ४) दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट असून, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
राज्यात रविवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण व मध्य महाराष्ट्रातील तुरळक भागात मुसळधार पाऊस पडला. उर्वरित राज्‍यात हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली होती. घाटमाथ्यावरही पावसाचा जोर वाढल्याचे दिसून आले. सध्या कोकणात पावसाची दमदार हजेरी दिसून येत आहे, तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. त्यात मॉन्सूनचा जोर कमी असल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात मात्र विजांसह पावसाची शक्यता आहे. पुढील चार दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या जोरदार सरी तर विदर्भात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सोमवारी येथे पावसाचा यलो अलर्ट :
ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अमरावती, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j24272 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top