
अकरा शाळांना ६१ लाखांची मदत ‘सकाळ रिलीफ फंड’कडून पाचव्या टप्प्यातील निधीचे वितरण
- बातमी बुधवारच्या (ता. २२) मुख्य अंकात सर्व आवृत्तींसाठी प्रसिद्ध करावी.
- ‘सकाळ रिलीफ फंड’चा लोगो वापरावा.
------------------------------
72328
बुधवार पेठ, सकाळ कार्यालय : ‘सकाळ रिलीफ फंड’ अंतर्गत आपत्तीग्रस्त भागांतील अकरा शाळांना मदत निधी देण्यात आला. या वेळी शाळांच्या प्रतिनिधींसमवेत सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, राजेश शहा, वालचंद संचेती, डॉ. सतीश देसाई, महेंद्र पिसाळ, सूर्यकांत पाठक व इतर मान्यवर.
अकरा शाळांना ६१ लाखांची मदत
‘सकाळ रिलीफ फंड’कडून पाचव्या टप्प्यातील निधीचे वितरण
पुणे, ता. २१ : कोल्हापूर, सांगली, चिपळूण व महाड येथील पूरग्रस्त भागांतील अकरा शाळांना शैक्षणिक साहित्य खरेदी, शाळा दुरुस्ती, इमारत बांधकाम आणि वर्गखोल्यांच्या नूतनीकरणासाठी एकूण ६१ लाख रुपयांची मदत नुकतीच देण्यात आली. ‘सकाळ रिलीफ फंड’ अंतर्गत मदतीच्या पाचव्या टप्प्यात हा निधी वितरित करण्यात आला. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते या निधीचे वितरण करण्यात आले.
सकाळ रिलीफ फंड समितीचे सदस्य डॉ. सतीश देसाई, राजेश शहा, वालचंद संचेती, सूर्यकांत पाठक, श्रीराम यादव, अॅड. शिवराज कदम-जहागीरदार, विश्वस्त महेंद्र पिसाळ व लाभार्थी शाळांचे शाळा प्रमुख व मुख्याध्यापक या वेळी उपस्थित होते. २०१९-२०२१ मध्ये कोल्हापूर, सांगली परिसरात आलेला महापूर, तसेच चिपळूण व महाड येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वसामान्यांचे जीवन प्रभावित होऊन मोठे नुकसान झाले होते. शाळांच्या वर्गखोल्यांची मोठ्या प्रमाणात पडझड व दुरवस्था झाली होती. कोल्हापूर, सांगली परिसरात पूरपरिस्थितीमुळे ‘सकाळ रिलीफ फंड’ अंतर्गत पूरग्रस्त भागातील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी आपत्तीग्रस्तांना तातडीची मदत म्हणून जीवनावश्यक साहित्य अन्नधान्य, कपडे व औषधे पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच मदत निधी उभारणीसाठी नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते. त्यास समाजातील दानशूर व्यक्तींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आपत्तीग्रस्त भागांतील अनेक शाळांनी शैक्षणिक साहित्य व वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी सकाळ रिलीफ फंडाकडे अर्ज आले होते. त्यानुसार शाळांची पाहणी करून मदतीचे पाच टप्पे करण्यात आले. त्यानुसार एकूण बत्तीस शाळांना शैक्षणिक व प्रयोगशाळा साहित्य खरेदी, वर्गखोल्यांची दुरुस्ती आणि इमारतींचे बांधकाम व नूतनीकरणासाठी एकूण एक कोटी ९७ लाख २६ हजार रुपयांचा निधी सकाळ रिलीफ फंडाने उपलब्ध करून दिला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m82352 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..