
धूतपापेश्वर लिमिटेड
‘श्री धूतपापेश्वर लिमिटेड’च्या
स्थापनेला दीडशे वर्षे पूर्ण
पुणे, ता. ३० ः ‘श्री धूतपापेश्वर लिमिटेड’च्या स्थापनेला दीडशे वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने आयुर्वेदातील उत्कृष्टतेच्या वाटचालीतला महत्त्वाचा टप्पा कंपनीने गाठला आहे. इसवीसन १८७२ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीने आयुर्वेदाबाबतची आपली कटिबद्धताही दाखवून दिली आहे.
वैद्य कृष्णशास्त्री पुराणिक यांनी लावलेल्या या बीजाचा आज ‘श्री धूतपापेश्वर लिमिटेड’ या नावाने विस्तार झाला आहे. कृष्णशास्त्री यांनी आयुर्वेदाच्या मूळ स्वरूपात तडजोड न करता उत्पादन वाढवण्याचे तंत्र विकसित केले. त्यानंतर पुढच्या पिढ्यांनी हेच तत्त्व कायम ठेवले. आज दीडशे वर्षांनंतरही कंपनी ‘श्री धूतपापेश्वर स्टँडर्ड्स (एसडीएस)’ या अंतर्गत दर्जामोजणीच्या साह्याने उत्पादनांचा दर्जा जपत आहे. संस्थापकांच्या पाचव्या पिढीतील; तसेच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रणजित आनंद पुराणिक म्हणाले, ‘‘आयुर्वेदिक संहितांनुसार त्यांची तत्त्वे समजून घेऊन त्यानुसार उत्पादन प्रक्रिया राबवून ती प्रत्येक बॅचमध्ये कायम ठेवण्यातल्या सातत्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. आयुर्वेदाची शिकवण समजून घेऊन आरोग्य रुजवणे आणि आनंद प्रदान करणे हे काम आम्ही करतो आणि पुढेही करत राहू.’’ कंपनीचे पनवेल आणि बंगळूर अशा दोन ठिकाणी उत्पादन प्रकल्प असून, सुमारे बाराशे विक्री प्रतिनिधी आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m85630 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..