कऱ्हा़ड स्फोटकांची दुचाकीउडवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कऱ्हा़ड स्फोटकांची दुचाकीउडवली
कऱ्हा़ड स्फोटकांची दुचाकीउडवली

कऱ्हा़ड स्फोटकांची दुचाकीउडवली

sakal_logo
By

79191
करवडी ः पोलिसांनी गुरुवारी स्फोटकांसह दुचाकी अत्यंत काळजीपूर्वक नष्ट केली.


दरोडेखोरांची दुचाकी
स्फोट करून नष्ट
कऱ्हाडजवळील करवडीमध्ये कारवाई
कऱ्हाड, ता. २१ ः गजानन हाउसिंग सोसायटीतील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशिनच्या दरोड्यासाठी वापरलेल्या जिलेटिनचा पोलिसांनी स्फोट केला. त्याच दरोड्यातील दुचाकी करवडी (ता. कऱ्हाड) येथील शेतात लपवून ठेवली होती. ती बुधवारी (ता. २०) रात्री दहाच्या सुमारास पोलिसांना सापडली. संशय आल्याने पोलिसांनी तपासणी केली. बॉम्ब शोध व श्वान पथकांनी दुचाकीत जिलेटिनची स्फोटके असल्याची खात्री दिली. ती स्फोटके काढताना दगाफटकाही होण्याचा धोका होता. त्यामुळे पोलिसांनी आज सकाळी ११ वाजता स्फोटकासह दुचाकी स्फोट करून नष्ट केली. त्यावेळीही मोठा धमाका दिल्याने करवडी परिसरात घबराट पसरली.
दरोडेखोरांचा सैदापूर येथे बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटर जिलेटिनने उडविण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेने सोमवारी पहाटे फसला. दरोडेखोरांनी डोळ्यात स्प्रे मारल्याने चार पोलिस जखमी झाले होते. त्याही स्थितीत एकास अटक आहे. सचिन वाघमोडे (मूळ रा. बीड, सध्या रा. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. घटनास्थळी सापडलेली दुचाकी वाघमोडेचीच आहे, असे तपासात निष्पन्न झाले. अन्य तिघे फरारी आहेत. दुसरी दुचाकी वापरल्याची माहिती पोलिसांना संशयिताने दिली होती. जिलेटिनची स्फोटके त्याच दुचाकीवरून आणली होती, अशीही माहिती मिळाल्याने पोलिस त्या दुचाकीचा शोध घेत होते. सहायक पोलिस निरीक्षक अमित बाबर यांच्या पथकाला काल रात्री नऊच्या सुमारास करवडीच्या शेतात आडबाजूला लपवून ठेवलेल्या स्थितीत ती दुचाकी सापडल्याने खळबळ उडाली होती.

दुसरा स्फोट...
दरोड्यात करवडीतील संशयित डॉ. शुभंतू पोळ याचाही समावेश आहे. नगर जिल्ह्यातील अशोक झांबरे व त्याच्यासोबत अन्य एक प्रवचनकारही टोळीत आहे. चौघांनी एटीएम सेंटर स्फोटकांनी उडविण्याचा कट रचला होता. मात्र, तो प्रयत्न फसला. एटीएम सेंटरमधील पहिला स्फोट सोमवारी (ता. १८) पोलिसांनी घडवला. त्या वेळी जागा मोकळी व बंदिस्त केली होती. त्याच दरोड्यात डॉ. पोळच्या शेतात लावलेली त्याचीच दुचाकी स्फोटकासह पोलिसांना सापडली. त्यातील स्फोटके धोकादायक असल्याने त्याही दुचाकीचा स्फोट पोलिसांनी घडवत ती स्फोटके नष्ट केली. एकाच टोळीने वापरलेल्या स्फोटकांचा दुसरा स्फोट पोलिसांनी केला.

------------

PNE22S79191
krd21p11.jpg

Web Title: Todays Latest Marathi News Pne22n85859 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..