मेटारोल इस्पातची यशोगाथा आज ‘साम’वर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेटारोल इस्पातची यशोगाथा आज ‘साम’वर
मेटारोल इस्पातची यशोगाथा आज ‘साम’वर

मेटारोल इस्पातची यशोगाथा आज ‘साम’वर

sakal_logo
By

मेटारोल इस्पातची यशोगाथा
आज ‘साम’वर

पुणे, ता. २६ ः देशातील अनेक पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या उभारणीत मोलाचा वाटा असलेल्या जालना येथील ‘मेटारोल इस्पात’ची यशोगाथा ‘साम’ टीव्हीवर शुक्रवारी दुपारी तीन वाजून २५ मिनिटांनी सादर करण्यात येणार आहे.
उद्योग क्षेत्रात काहीतरी नवे करण्याची उमेद असलेले नऊजण १९९६ च्या सुमारास एकत्र आले. सुरुवातीला एक भूखंड मिळवून त्यावर माऊली स्टीलचे उत्पादन सुरू केले. काम सुरू झाले. ऑर्डर्स मिळू लागल्या. पुढे हा उद्योग जालना येथे मेटारोल इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या नावाने विस्तारला अन् बहरलाही. ‘मेटारोल इस्पात’चे स्टील हे स्टील उद्योगातील रोल मॉडेल आहे. मेटारोल इस्पात राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रख्यात होण्यामागे अथक परिश्रम, संघर्ष आहे. त्याची यशोगाथा ‘साम’वर प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
गुजरातमध्ये कच्छ येथे भूकंप झाला होता. या शहराची नव्याने उभारणी करताना मेटारोल स्टीलचा वापर केला. तसेच नर्मदा कॅनॉलची उभारणी, देशातील अनेक पायाभूत सुविधांमध्ये मेटारोल इस्पातचा सहभाग आहे. तसेच, मेटारोलने भारतीय स्टील उद्योगात मजबुती आणि लवचिकतेचा पाया अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञान आणि भारतीय मेटारोल संशोधनाने रचला आहे. मेटारोल देशातल्या मोजक्या आणि देशाचे स्टील हब जालन्यातील एकमेव शुद्ध स्टीलचे निर्माते जे बांधकामासाठीच्या स्टील सळयांच्या निर्मितीसाठी ‘एलआरएफ’ टेक्नॉलॉजी वापरतात.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r06345 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top