‘अथर्व ग्रुप’ची यशोगाथा आज साम टीव्हीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अथर्व ग्रुप’ची यशोगाथा आज साम टीव्हीवर
‘अथर्व ग्रुप’ची यशोगाथा आज साम टीव्हीवर

‘अथर्व ग्रुप’ची यशोगाथा आज साम टीव्हीवर

sakal_logo
By

अथर्व ग्रुप’ची यशोगाथा
आज साम टीव्हीवर
पुणे, ता. ३० ः आंतरराष्ट्रीय दर्जाची फॅसिलिटी आणि क्वालिटी पार्टस उत्पादित करणाऱ्या प्रख्यात अथर्व ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची यशोगाथा ‘साम टीव्हीवर’ मंगळवारी दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी दाखविण्यात येणार आहे.
लघु उद्योगातून सुरवात करणारे उद्योजक मानसिंग पाचुंदकर पाटील यांनी अवघ्या चाळीशीमध्ये भरारी मारत अथर्व ग्रुप प्रख्यात केला आहे. सर्व्हिस इंडस्ट्री, बस वाहतूक, वेअर हाउसिंग, मॅन्युफॅक्चरिंग, पॅकेजिंग, मेटल इंडस्ट्री, औषध निर्मिती आदी विविध क्षेत्रांमध्ये अथर्व ग्रुपने भरारी मारली आहे. या ग्रुपची सध्या वार्षिक उलाढाल ५०० कोटी रुपयांची असून २०२४-२५ पर्यंत एक हजार कोटी रुपयांपर्यंत उलाढाल वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या ग्रुपच्या माध्यमातून सुमारे दोन हजार कामगारांना रोजगार मिळाला आहे. ग्रुपची अनेक उत्पादने परदेशातही निर्यात होतात. पुण्यातील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’मध्ये अथर्व ग्रुपचे जागतिक दर्जाचे कॉर्पोरेट ऑफिस आहे. मानसिंग पाचुंदकर यांनी लघुउद्योजक म्हणून सुरवात करताना अनेक कंपन्या कशा उभारल्या, आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे पोचले, याबाबतची यशोगाथा साम टीव्हीवर दाखविणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r07702 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top