krd1114f.txt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

krd1114f.txt
krd1114f.txt

krd1114f.txt

sakal_logo
By

कोयना धरणातून पुन्हा विसर्ग सुरू
पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात वळिवाच्या पावसाने दमदार हजेरी लावली. रात्रीपासून पुन्हा पाऊस कोसळत असल्याने दोन हजार ४६९ क्युसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू आहे. धरणात १००.७० टीएमसी पाणीसाठा आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी फक्त ४.५५ टीएमसी पाण्याची गरज आहे. पाण्याची आवक वाढल्याने धरणातून आज रात्री वीजनिर्मिती करून एक हजार ५० क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले.
गेल्या पाच दिवसांपासून वळिवाचा पाऊस हजेरी लावत आहे. दोन दिवसांपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून धरणात प्रतिसेकंद दोन हजार ४६९ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणात सध्या १००.७० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणात उपयुक्त पाणीसाठा ९५.७० टीएमसी आहे. २४ तासांत कोयनानगरला ३६ (४००९), नवजात २६ (४८८७), तर महाबळेश्वरला २३ (५२५०) मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणातील पाणीपातळी निर्धारित करण्यासाठी व्यवस्थापनाने धरणाच्या पायथा वीजगृहातून रात्री आठनंतर पायथा वीजगृह सुरू करून त्यातून एक हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r65869 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..