डेटा ॲनॅलिटीक्सचे महत्त्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेटा ॲनॅलिटीक्सचे महत्त्व
डेटा ॲनॅलिटीक्सचे महत्त्व

डेटा ॲनॅलिटीक्सचे महत्त्व

sakal_logo
By

डेटा ॲनॅलिटीक्सचे महत्त्व
गेल्या दशकात, इंटरनेट वापरकर्त्यांच्या वाढीमुळे भारताने डेटा अॅनॅलिटिक्स उद्योगात स्फोटक वाढ अनुभवली आहे. जागतिक बँकेच्या मते, २०२५ पर्यंत भारतात ९०० दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते होण्याची अपेक्षा आहे. यामुळे डेटा संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे आणि यापुढेही मोठ्या प्रमाणात होणार आहे. या वाढीने डेटा अनॅलिटीक्स क्षेत्राच्या वाढीसाठी आधार पुरवला आहे ज्याचा वापर संभाव्यपणे वेगवेगळ्या मार्केटमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी केला जाऊ शकतो. डेटा अनॅलिटीक्स उद्योगाने आधीच २०२१ मध्ये २६.५ टक्के वार्षिक वाढ नोंदवली आहे, ज्याचे बाजार मूल्य ४५.४ यूएस अब्ज डॉलरपर्यंत पोहोचले आहे. डेटा अनॅलिटीक्स हे कंपन्यांना आणि सरकारी संस्थांना डेटा गोळा करण्यासाठी आणि डेटामधील पॅटर्न्स ओळखण्यासाठी मदत करते. हे संस्थेसाठी निर्णय घेण्याबाबत चांगल्या इन्साईट्स निर्माण करण्यास मदत करते आणि कधीकधी निर्णय घेण्याची प्रक्रिया स्वतःच स्वयंचलित करते. डेटा अॅनालिटिक्स हे व्यवसायात परिवर्तन करण्यास आणि त्वरित निर्णय घेण्यासाठी खर्च आणि वेळ कमी करण्यास मदत करते. डेटा अॅनालिटिक्स उद्योगाने भारतीय कंपन्यांवर विशेषतः त्यांच्या दैनंदिन कामकाजावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे. डेटा अॅनालिटिक्सने विविध उद्योग-व्यवसायांना त्यांचे काही पैलू पूर्णपणे स्वयंचलित करण्यास सक्षम केले आहे. डेटाला नव्या जगाचे तेल मानले जाते. उद्योग आणि सरकारे अधिक चांगली उत्पादने तयार करण्यासाठी आणि उच्च दर्जाच्या सेवा देण्यासाठी डेटा विश्लेषणावर लक्ष केंद्रित करत आहेत.

अधिक माहितीसाठी दिलेला क्यूआर कोड स्कॅन करा.---------------६७९३३

Web Title: Todays Latest Marathi News Pne22x14898 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top