कर्मवीर जयंती कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्मवीर जयंती कार्यक्रम
कर्मवीर जयंती कार्यक्रम

कर्मवीर जयंती कार्यक्रम

sakal_logo
By

शिक्षण संस्थांनी सक्षम व्हावे
कुलगुरू शिर्के; साताऱ्यात कर्मवीरांना अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
सातारा, ता. २२ ः राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर अनेक जण टीका करतात; पण फक्त नोकरी करणाराच नव्हे, तर उद्योग व्यवसाय करत नोकऱ्या निर्माण करणारा विद्यार्थी तयार करण्याचा या धोरणाचा उद्देश आहे. या बदलाला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण संस्थांनी सक्षम राहिले पाहिजे, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांनी आज येथे व्यक्त केले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कर्मवीर समाधी परिसरात झालेल्या कार्यक्रमात कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते. या वेळी रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, उपाध्यक्ष ॲड. भगिरथ शिंदे, सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंमग मेनकुदळे, सहसचिव प्राचार्य राजेंद्र साळुंखे, प्राचार्य शहाजी डोंगरे, कर्मवीर कुटुंबीय उपस्थित होते. कर्मवीर भाऊराव पाटील, सौ. लक्ष्मीबाई पाटील यांच्या त्यागातून अनेक संघर्षातून ही संस्था उभी राहिल्यानेच संस्था शैक्षणिक क्षेत्रातील सर्व बदल करत यशस्वी वाटचाल करत असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, ‘‘कोविड काळ हा सर्वांची परीक्षा पाहणारा काळ होता. शाळा बंद ठेवाव्या लागल्या; पण शिक्षण बंद करून परवडणारे नव्हेत. ऑनलाइन शिक्षणात ‘रयत’ने बाजी मारली. हे नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने कौतुकास्पद आहे. आपण शिकतो कशासाठी आणि शिकवतो कशासाठी याचा विचार केला, तर पालक म्हणतील नोकरीसाठी शिकतो; पण या शिक्षणातून नोकरीक्षम विद्यार्थी निर्माण करण्यात आपण कमी पडतोय म्हणूनच हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आले आहे. दूरशिक्षण, आॅनलाइन शिक्षणाला पर्याय राहणार नाही. काळाची पावले ओळखून बदल स्वीकारलेच पाहिजेत.’’
या वेळी डॉ. अनिल पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या संघर्षातून झालेल्या वाटचालीची माहिती दिली. प्रारंभी सचिव प्राचार्य डॉ. शिवणकर यांनी संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली. सहसचिव प्राचार्य डॉ. मेनकुदळे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y27790 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..