
कऱ्हाड उड्डाणपूलआजपासून पाडणार
कऱ्हाडच्या कोल्हापूर नाक्यावरील
उड्डाणपूल आजपासून पाडणार
कऱ्हाड ः राष्ट्रीय महामार्गावरील येथील कोल्हापूर नाक्यावरील बहुचर्चित उड्डाणपूल उद्या (बुधवारी) सकाळपासून पाडण्यात येणार आहे, अशी माहिती डीपी जैन कंपनीचे सतेंद्र कुमार वर्मा यांनी दिली. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आढावा बैठक घेतली. त्या बैठकीनंतर श्री. वर्मा यांनी माध्यमांना पूल पाडण्यासंदर्भातील माहिती दिली.
आमदार चव्हाण यांनी अधिकाऱ्यांसमवेत जाऊन कोल्हापूर नाका व ढेबेवाडी फाटा येथील दोन्ही पुलाची पाहणी केली. कोल्हापूर नाका येथील २००३ मध्ये बांधलेला उड्डाणपूल जमीनदोस्त होणार आहे. त्यासाठी ५५० कोटींचा खर्च केला होता. हा पूल ३.२ किलोमीटरचा आहे. नवीन पुलाचे काम अदानी समूहातर्फे डीपी जैन कंपनी करणार आहे. तो पूल आठ पदरी होणार आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून उड्डाण पुलावरील वाहतूक बंद केली आहे. दोन दिवसांपासून वाहतूक वळविण्यात आली आहे.
krd07p2.jpg २३२६३
कऱ्हाड ः कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पुलाची पाहणी करताना आमदार पृथ्वीराज चव्हाण.
----------------