एलआयसीच्या उत्पन्नात आणि नफ्यातही लक्षणीय वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एलआयसीच्या उत्पन्नात आणि नफ्यातही लक्षणीय वाढ
एलआयसीच्या उत्पन्नात आणि नफ्यातही लक्षणीय वाढ

एलआयसीच्या उत्पन्नात आणि नफ्यातही लक्षणीय वाढ

sakal_logo
By

एलआयसीच्या उत्पन्नासह
नफ्यातही लक्षणीय वाढ
मुंबई, ता.१३ : भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने डिसेंबर तिमाहीत नफ्यात आणि उत्पन्नातही घसघशीत वाढ नोंदवली आहे. कंपनीने नुकतेच तिमाही आणि नऊमाही आर्थिक निकाल जाहीर केले. त्यानुसार, या आर्थिक वर्षात ऑक्टोबर-डिसेंबर २०२२ या तिमाहीत एलआयसीच्या उत्पन्नात १४.५ टक्क्यांनी वाढ झाली असून, निव्वळ नफा ८,३३४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत हा नफा २३५ कोटी रुपये, तर सप्टेंबर तिमाहीत तो १५,९५२ कोटी रुपये होता. तर ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांसाठी, प्रीमियम उत्पन्नात २०.६५ टक्क्यांची वाढ नोंदवत तीन लाख ४२ हजार २४४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत ते दोन लाख ८३ हजार ६७३ कोटी रुपये होते. डिसेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीत त्यांचे निव्वळ प्रीमियम उत्पन्न १,११,७८७ कोटी रुपये होते, तर २०२१-२२ मध्ये याच तिमाहीत ९७,६२९.३४ कोटी रुपये होते. डिसेंबरअखेर संपलेल्या नऊमाहीत एकूण १.२९ कोटी पॉलिसी विकल्या गेल्या. डिसेंबर २०२१ अखेर हे प्रमाण १.२६ कोटी होते. एलआयसीच्या या कामगिरीबाबत अध्यक्ष एम. आर. कुमार म्हणाले, ‘‘वैविध्यपूर्ण उत्पादने देण्याचे आमचे ध्येय गाठण्याकडे आम्ही पावले टाकत आहोत. त्यामुळे आमच्या व्यवसायात भरघोस वाढ झाली असून, बाजारातील हिस्साही वाढत आहे. ही वाढ अशीच राहील, असा आम्हाला विश्वास आहे.’’