
‘लोकमान्य सोसायटी’च्या पुणे विभागीय कार्यालयाचा वर्धापनदिन उत्साहात
लोकमान्य सोसायटीच्या पुणे विभागीय
कार्यालयाचा वर्धापनदिन उत्साहात
पुणे, ता. ७ ः ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि.’च्या पुणे विभागीय कार्यालयाचा सातवा वर्धापनदिन रविवारी उत्साहात साजरा झाला.
वर्धापनदिनाच्या निमित्ताने सेनापती बापट रस्त्यावरील आयकॉनिक इमारत असलेल्या ‘लोकमान्य सोसायटी’च्या पुणे विभागीय कार्यालयात विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळी, सर्व ग्राहक-सभासद, हितचिंतक व मान्यवरांनी प्रत्यक्ष कार्यालयास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
लोकमान्य सोसायटीतर्फे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर व विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले व शुभेच्छांचा स्वीकार केला. शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या पुणेकरांमध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, प्रसारमाध्यम, वैद्यकीय, उद्योग आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश होता. लोकमान्य सोसायटी व पुणेकरांमध्ये एक वेगळाच ऋणानुबंध निर्माण झाला आहे. आपल्या पारदर्शक व्यवहारांच्या बळावर वित्तीय क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात देखील ‘लोकमान्य सोसायटी’ने पुणे महानगरसह संपूर्ण महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे जाधव यांनी सांगितले.